चंद्रपूर : ताडोबात दोन वाघिणी एकमेकांना भिडल्या; व्हिडिओ व्हायरल | पुढारी

चंद्रपूर : ताडोबात दोन वाघिणी एकमेकांना भिडल्या; व्हिडिओ व्हायरल

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : वन्यप्राणी गणनेच्या पुर्वसंध्येला ताडोबाच्या तेलिया तलाव परिसरात दोन वाघिणी एकमेकांविरोधात भिडल्या. ही घटना गुरूवारी (दि.२३) सायंकाळी ६ च्या दरम्यान घडली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे पुन्हा ताडोबात वाघांमधील अस्तित्वाचा संघर्ष पहायला मिळाला.

जगात व्याघ्रदर्शनासाठी प्रसिद्ध ताडोबात सध्या वाघांमधील झुंजीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घटनेत अनेक वाघांच्या बछड्यांचे जीव गेले आहेत. त्यामध्ये वनविभागाने झुंज झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. ताडोबात गुरूवारी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री प्राणी गणना सूरू झाली होती. यादरम्यान कोअर झोनमध्ये गाभा तेलिया तलाव परिसरात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी सोनम आणि कॉलरवाली वाघिणीत जोरदार संघर्ष झाला. हा थरार ताडोबातील अनेक पर्यटकांनी अनुभवला.

ताडोबात शेकडो वाघ आहेत या प्रत्येक वाघाने आप-आपले क्षेत्र निर्माण केले आहे. क्षेत्र निर्माण करण्यासाठी नव्याने आलेल्या वाघाला लढाई करून आपले अस्तित्व सिद्ध करावे लागते. दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला प्राणी गणना होत असते. या प्राणी गणनेच्या आधी दोन वाघिणीमधील झुंजीचा प्रसंग ताडोबातील कोअर झोनमध्ये पर्यटकांनी अनुभवला. त्यांनतर हा व्हिडीयो सोशल मीडियावर वायरल करण्यात आला. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमुळे पर्यटकांची मौज होत असली तरी, दोघांतील झुंज वन विभागासाठी चिंता वाढविणारी आहे.

हेही वाचा :

 

Back to top button