Hygiene Habits : पालकांनो, तुमच्या मुलांना स्वच्छतेच्या सवयी कशा लावाल?  | पुढारी

Hygiene Habits : पालकांनो, तुमच्या मुलांना स्वच्छतेच्या सवयी कशा लावाल? 

डॉ. पल्लवी राव चतुर्वेदी : लहानपणीच ज्या सवयी अंगी बाणवून घेतो, त्या मोठेपणी नियमीत सवयी पाळत असतो. या सवयी मग वर्तणुकीतील असतील, जीवनशैली विषयक असतील किंवा आहाराबद्दलच्या असतील. आरोग्याला हानी पोहोचविणाऱ्या आजारांना दूर ठेवण्यासाठी लहानपणापासूनच मूलभूत स्वच्छतेच्या सवयी (Hygiene Habits) मुलांना शिकविणे खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे पालकांना मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे. त्यासंदर्भात आपण जाणून घेऊ या…

चांगली स्वच्छता आणि आरोग्य सांभाळणे, आताच्या काळात तर ती अटळ बाब बनली आहे. नियमीत हात धुणे आणि रोज आंघोळ करणे या गोष्टी अत्यावश्यक बनल्या आहेत. पूर्वी आपण सहज हस्तांदोलन करत होतो. आता त्याऐवजी नुसते लांबून हात हलवला जातो. मोठ्या समुहात बसून एकत्र खाणे-पिणे याचे प्रमाण आता कमी झाले आहे. खोकताना, शिंकताना तुम्ही स्वतःचे तोंड झाकलेले असणे या आता नेहमीच्या आरोग्य आणि स्वच्छताविषयक सवयी बनल्या आहेत.

Hygiene Habits

प्रौढ व्यक्ती म्हणून अशा प्रकारची काळजी आणि खबरदारी घेण्यासाठी आपण सावध बनलेले असताना, अशा निरोगी आरोग्यपूर्ण सवयींसाठी (Hygiene Habits) लहान मुलांना तयार करणे हेही महत्वाचे बनले आहे. दैनंदिन पातळीवर, मुलं शाळा, घर, मैदान येथे अनेकांशी संवाद साधत असतात. अशा परिस्थितीत आपल्या मुलांमध्ये सकारात्मक आरोग्य स्वच्छता विषयक सवयी रुजविणे पालकांसाठी अधिक कठीण बनले आहे. त्यासाठीच पालकांचं शिक्षण होणं गरजेचं बनलं आहे.

स्वच्छतेचे महत्त्व स्पष्ट करून सांगणे

लहान मुलांकरिता, आरोग्यदायी स्वच्छतेची चांगली सवय मुलांमध्ये रुजविणे पालकांसाठी खूप महत्वाचे असते. दररोज दात घासणे, अंघोळ करणे हे शिकविणे, खाण्याच्या आधी आणि नंतर हात धुणे, बाहेरून घरी आल्यानंतर स्वतःची स्वच्छता राखणे, खोकताना आणि शिंकताना स्वतःचे तोंड झाकून घेणे इत्यादी अगदी मूलभूत सवयी आहेत. जोडीला, मुलांना जर या प्रत्येक गोष्टीमागचे कारण आणि परिणाम समजले तर त्या सवयींचा अंगीकार करणे त्यांच्यासाठी सोपे जाते. उदाहरणार्थ : मुलांना असे सांगा की, जर ते आजारी पडले तर ते शाळेत किंवा मैदानात जाऊ शकणार नाहीत. त्यामुळे आपोआप त्यांच्या मनात भीतीची भावना निर्माण होईल आणि आवश्यक ती काळजी घेण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळेल.

मुलांसाठी त्यांच्यासमोर योग्य वर्तणूक ठेवा

लहान मुलांवर त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणाचा जबरदस्त पगडा असतो. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना योग्य ते शिकविणे महत्वाचे असते. जसे पालक वागतात त्याच पद्धतीने मुलं त्यांचे अनुकरण करत असतात. जर तुमच्या मुलाने तुम्हाला हॉटेलमध्ये वेटर बरोबर गैरवर्तन करताना पाहिलं किंवा तुमच्यासाठी दार उघडताना आणि बंद करून घेताना सुरक्षारक्षकाला धन्यवाद देताना पाहिलं तर मुलंही तसेच वागतील. त्यामुळे पालक आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी सर्वप्रथम या चांगल्या सवयी स्वतःला लावून घेतल्या पाहिजेत. आणि मग मुलांनी त्या सवयींचा अंगीकार करावा म्हणून प्रयत्न केला पाहिजे. गमतीशीर खेळ आणि उपक्रम यांच्या माध्यमातून मुलांमध्ये प्रभावीपणे चांगल्या सवयी रुजविता येतात. प्रोटेक्टस मॅजिक हँडवॉश हा असाच एक प्रभावी पर्याय आहे. यामध्ये मुलांना पावडर रूपातून द्रव रुपात हँडवॉश बनविण्यात खूप मजा येते. (Hygiene Habits)

बाजू मांडणारे छोटे वकील घडविताना

तुमचे मूल आरोग्यदायी स्वच्छतापूर्ण सवयी अंगी बाणवत आहे आणि त्याची/तिची योग्य ती काळजी घेत आहे, याची खात्री करतानाच त्याचे/तिचे मित्रमैत्रीण आणि वर्गात शिकणारे सहाध्यायीदेखील या सवयी अंगी बाणवतात का हे बघणे खूप महत्वाचे असते. लहान वयाची मुले संवेदनशील असतात. एकमेकांना निरोगी, रोगमुक्त आणि सुरक्षित ठेवण्याची गरज त्यांना समजावून सांगणे खूप महत्वाचे असते. एकदा का तुम्ही तुमच्या पाल्याला या चांगल्या सवयी शिकविल्या की, ते त्यांच्या आजूबाजूच्या लोकांवर त्याचा प्रभाव पाडायला लागतात. अनुकरण करणे आणि आपला मित्र वापरत असलेली गोष्ट आपणही वापरणे मुलांच्या दृष्टीने खूप स्वाभाविक असते.

Hygiene Habits

याचा उपयोग चांगल्या सकारात्मक पद्धतीने करून आपल्या मुलाला आणि त्यांच्या मित्रमैत्रीणींना डासांच्या त्रासापासून किंवा मलेरिया, डेंग्युसारख्या जीवघेण्या आजारांपासून वाचविण्यासाठी मुलांना गुडनाईट फॅब्रिक रोल-ऑन चा वापर करायला लावणे किंवा डास प्रतिबंधक पॅच वापरणे अशा गोष्टी पालक करू शकतात. जेव्हा एखादे मूल आपल्या मित्राला डास प्रतिबंधक रोल-ऑन वापरताना बघते, तेव्हा नकळत त्याच्या अंगीही ती सवय भिनते. इतर आजारांचा मनात विचार करून चांगल्या सवयी रुजविता येऊ शकतात.

आणखी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे, ती म्हणजे नेहमी सकारात्मक चांगल्या वर्तणुकीचे कौतुक करणे. मुलाने एखादी चांगली गोष्ट केली किंवा चांगली सवय अंगी बाणवली तर छोट्यातल्या छोट्या का होईना, पण त्याचे कौतुक करायला हवे. घरात वा शाळेत, पालक आणि शिक्षकांनी मुले चांगली वागल्यावर दरवेळी त्यांचे कौतुकच केले पाहिजे. त्यामुळे त्यातून त्यांना प्रेरणा, प्रोत्साहन मिळते.

सकारात्मक पालकत्वासाठीच्या तीन सुलभ क्लृप्त्या 

१) चुकांचा स्वीकार : पालक म्हणून आपली मुले कशी वागतात आणि काय शिकतात याबाबत आपण खूप कठोर असतो. मुलं चुकली रे चुकली की पालक लगेच त्यांची चूक दुरुस्त करून द्यायच्या कामाला लागतात. पालक म्हणून आपण मुलांना थोडी स्वतःची मोकळी जागा द्यायला हवी. त्यांना चुका करायची आणि त्यातून शिकण्याची अनुमती द्यायला हवी.

२) खुला संवाद साधताना : आपल्याला सर्वांनाच आपल्या मुलांनी व्यवस्थित आणि आज्ञाधारकपणे वागावं असं वाटत असताना दुहेरी संवाद साधणे हेही पालकांसाठी महत्वाचे असते. यामुळे तुमच्या मुलांनाही तुमच्याशी मोकळेपणाने आणि खुला संवाद साधणे सोपे होते आणि त्यांना स्वतःची मते बनवायला आणि दृष्टीकोन तयार करायला मदत होते.

३) मुलांना चांगला आणि वाईट दोन्ही कळू द्या : तुमच्या मुलानं मोठेपणी जसं व्हावं, असं तुम्हांला वाटतं तशी व्यक्ती तुम्ही बनण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मुलाच्या वाढीच्या वयात त्याच्यासमोर योग्य वर्तणुकीचा आदर्श उभा करणे महत्वाचे असते. तुम्ही खरे जसे आहात तसे तुमच्या मुलांना तुम्हांला बघायची अनुमती द्या. जर ऑफिसमध्ये तुमचा दिवस वाईट गेला असेल किंवा तुमच्या घरात समारंभ असेल तर त्यांना त्याचा भाग होऊ द्या. मुलांना भविष्यासाठी तयार करताना चांगली आणि वाईट परिस्थिती आपण कशी हाताळतो हे मुलांना समजणे खूप महत्वाचे असते. आयुष्यभरासाठीच्या चांगल्या सवयी अंगी बाणवण्यासाठी तुमच्या मुलांच्या या त्यांना घडवणाऱ्या वर्षांचा सर्वोत्तम उपयोग करून घ्या.

हे वाचलंत का?

Back to top button