

पुढारी ऑनलाईन डेस्क: लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतदानाचा दुसरा टप्पा आज पार पडत आहे. महाराष्ट्रासह देशातील १२ राज्यांतील ८८ लोकसभा मतदारसंघांत आज शुक्रवारी (दि. २६ एप्रिल) मतदान होत आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यात दुपारपर्यंत महाराष्ट्रात सर्वात कमी ४३. १ टक्के तर त्रिपुरात सर्वाधिक ६८.९२ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. (Lok Sabha Election)
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानात केरळच्या वायनाडमधून लढणारे काँग्रेस नेते राहुल गांधी, राजस्थानच्या कोटा येथून रिंगणात असलेले लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, उत्तर प्रदेशातील मथुरा मतदारसंघात भाजपकडून लढणार्या अभिनेत्री हेमा मालिनी, रामाची भूमिका साकारणारे मेरठमधील उमेदवार अभिनेते अरुण गोविल यांच्यासह तीन केंद्रीय मंत्री, दोन माजी मुख्यमंत्री आणि इतर अनेक दिग्गज नेत्यांचे राजकीय भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. दुसर्या टप्प्यात एकूण १,१९८ उमेदवार रिंगणात असून, त्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
हे ही वाचा :