नागपूर: वर्धमाननगरात २२०९ किलो प्लास्टिक जप्त | पुढारी

नागपूर: वर्धमाननगरात २२०९ किलो प्लास्टिक जप्त

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : राज्यात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी असताना सुद्धा नागपुरात सर्रास कॅरी बॅगची निर्मिती करणा-या वर्धमाननगर येथील रिद्धी सिद्धी प्लास्टिक कंपनीवर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने छापा मारला. यावेळी २२०९ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.

महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे संयुक्तरित्या करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये २२०९ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या प्लास्टिकची अंदाजे किंमत १ लाख ५४ हजार ६३० रुपये एवढी आहे.
वर्धमान नगर परिसरात रिद्धी सिद्धी कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सिंगल यूज प्लास्टिकची निर्मिती सुरू असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाला प्राप्त झाली. यासंदर्भात मनपा आयुक्त तथा डॉ. अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार घनकचरा व्यस्थापन विभागाचे संचालक आणि उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले मार्गदर्शनामध्ये उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात पथक धडकले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला माहिती देऊन संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली.

या कारवाईमध्ये कंपनीचे मालक शैलेश शेजपाल यांच्यावर पर्यावरण संरक्षण कायदा आणि प्लास्टिक बंदी कायद्याअंतर्गत प्रथम कारवाई ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. २२०९ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. चार ठिकाणी कारवाईत २० हजार दंड वसूल करण्यात आला आहे.

हेही वाचा 

Back to top button