नरेंद्र मोदींच्या सभेत काँग्रेससाठी देणगी; राहुल गांधीचा फोटो, क्यूआर कोड | पुढारी

नरेंद्र मोदींच्या सभेत काँग्रेससाठी देणगी; राहुल गांधीचा फोटो, क्यूआर कोड

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बुधवारी (दि. २८) रोजी दुपारी यवतमाळ जिल्ह्यात भारी येथील महिला मेळाव्यात विविध योजनांचे लोकार्पण करणार आहेत. या सभेत काँग्रेसला देणगी देण्याचे आवाहन करणाऱ्या खुर्च्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

संबंधित बातम्या 

नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या निमित्ताने भव्य अशा शामियानात लावण्यात आलेल्या खुर्च्यांवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा फोटो आणि काँग्रेसला देणगीसाठी क्यूआर कोड लागलेले आहेत. आता मोदींच्या सभेत काँग्रेससाठी देणगी हा विषय माध्यमांमुळे लगेच सर्वदूर पोहोचला. याविषयीची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.

नागपुरात २८ डिसेंबरला काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने ‘है तैय्यार हम’ महारॅली पार पडली. यावेळी देणगीसाठी अफलातून शक्कल शोधून काढण्यात आली. १३८ व्या वर्धापनदिन निमित्ताने १३८, १३८०, १३८०० या प्रमाणात अधिकाधिक डोनेशन देण्याचे आवाहन करण्यात आले. सर्वाधिक देणगी देणाऱ्या ५ दानदात्यांचा स्वतः काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या हस्ते देणगी प्रमाणपत्र देऊन कार्यक्रमस्थळी सत्कार केला गेला. या खुर्च्या पुरविणाऱ्या कंत्राटदाराकडून हे स्टिकर न काढताच काही खुर्च्या नरेंद्र मोदींच्या सभेत पोहोचल्याने हा गोंधळ झाल्याचे उघडकिस आले आहे. ही बाब लश्रात येताच लगेच हे स्टिकर काढण्यात आले आहे.

Back to top button