त्र्यंबकेश्वरला दुष्काळाच्या झळा, पर्यटनावर परिणामाची भीती

त्र्यंबकेश्वर ,www.pudhari.news
त्र्यंबकेश्वर ,www.pudhari.news
Published on
Updated on

त्र्यंबकेश्वर(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- ञ्यंबकेश्वर शहरात सोमवार पासून एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय नगर परिषद प्रशासनाने घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. दरवर्षी उन्हाळयात ञ्यंबक शहराला एक दिवसआड पाणी पुरवठा होत असतो. मात्र त्याची अंलबजावणी साधरणत: एप्रिल दरम्यान होत असते. यंदा महिनाभर आगोदरच ञ्यंबकवासियांना पाण्याची अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

त्र्यंबक शहराचे दोन भागात विभाजन करण्यात आले आहे. यात एक दिवसआड एका भागाला 45 मिनिटे पाणी पुरवठा होणार आहे. शहराला अंबोली, गौतमी बेझे आणि आहिल्या धरणातून पाणी पुरवठा होते. त्यापैकी आहिल्या धरणात पौषवारीनंतर पाणीसाठा नसतो. मात्र, गौतमी बेझे आणि अंबोली धरणात जून महिना उलटला तरी देखील पाणी शिल्लक राहिल अशी स्थिती आहे.

मागील 20 वर्षांपासून नगरपरिषद पाणी पुरवठा विभाग, तांत्रिक अडचणी दूर करण्यास अयशस्वी ठरले आहे. धरणात पाणी असतांना देखील दररोज शहराला पुरेसे पाणी देणे शक्य होत नाही. माणसी 135 लिटर पाणी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. दर महिन्याला 10 ते 12 लाख रूपयांचे वीज बिल भरणा करून देखील धरणातून आवश्यक तेवढे पाणी उचलण्यास तांत्रीक अडचणी कायम राहील्या आहेत. नागरिकांना मात्र उन्हाळा पावसाळा पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

पर्यटनावर होणार परिणाम

यावर्षी सर्वत्र दुष्काळ आहे. कुशावर्ताचा साठा असलेला गंगासागर तलाव तळाला पोहचला आहे.तशात आता गावात पुरेसे पाणी येणार नाही.त्यामुळे उन्हाळयात याचा भाविक पर्यटनावर थेट परिणाम होण्याची भिती व्यक्त होत आहे.गोदावरीचे उगमस्थानी पिण्याच्या पाण्याची टंचाई पर्यटकांना धास्तावणारी आहे.

हेही वाचा :

—-

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news