हे दबावतंत्र सारे काही ठरवूनच! अनिल देशमुख यांचा आरोप | पुढारी

हे दबावतंत्र सारे काही ठरवूनच! अनिल देशमुख यांचा आरोप

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांना आज पुन्हा ईडीने चौकशीसाठी बोलवलं आहे. मुळात विरोधकांना केवळ महाराष्ट्रात नव्हे तर बाहेरील प्रांतातही त्रास दिला जात आहे. हे ठरवून सुरू असून विरोधकांना त्रास दिला जात आहे. यात केंद्रीय एजन्सी टार्गेट करत आहेत असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना केला.

संबंधित बातम्या 

ईडी कार्यालयात रोहित पवार जाणार आहेत. पक्ष नेतृत्व, पक्ष खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे. हे महाराष्ट्रातच नाही, तर दिल्लीत अरविंद केजरीवाल, बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनाही त्रास दिला जात आहे. आ. रोहित पवारांनी संघर्ष यात्रा काढली, युवक, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली म्हणूण ही कारवाई होत आहे. मला आणि संजय राऊतांना त्रास दिला.

लोक रस्त्यावर उतरले तेव्हा गेले नाहीत. याची सुरुवात शरद पवार यांच्यापासून झाली. दुसरीकडे भाजपच्या एकतरी नेत्यांवर कारवाई केली का? असा सवाल करतानाच ते कोणालाही अटक करू शकतात. तर अटक झाली की बेल होत नाही. एकंदरीत विरोधकांच तोंड बंद करण्याचे काम सुरू आहे. आज उघड्या डोळ्यांनी जनता पाहत आहे. निवडणुका जवळ येतील तसा या कारवाईला वेग येईल. भाजपचे आमदार अस्वस्थ आहेत. बाहेरून आलेले पहिल्या पंगतीत बसले, आमचा नंबर लागला नाही, असा दावा अनिल देशमुख यांनी केला.

Back to top button