नागपूर : आश्वासन हवेत, संगणक परिचालक कर्मचाऱ्यांचे पुन्हा उपोषणास्त्र | पुढारी

नागपूर : आश्वासन हवेत, संगणक परिचालक कर्मचाऱ्यांचे पुन्हा उपोषणास्त्र

नागपूर, पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील ग्रामपंचायतमध्ये काम करणारा संगणक परिचालक हा मागील 12 वर्षांपासून आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी लढत आहे. हिवाळी अधिवेशनात संगणक परिचालकांनी तब्बल 12 दिवस आंदोलन केले. आश्वासन हवेत विरले, काहीच फलित न मिळाल्याने पुन्हा संगणक परीचालकांना आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

त्यामुळे आता संगणक परीचालकांनी नागपूरच्या संविधान चौकात बेमुदत आमरण उपोषण सूरु केले आहे. संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन लागू कराव व निर्णय घेण्यास विलंब लागेल तर निर्णय होणारं तोपर्यंत आम्हाला 20 हजार रुपये पगार द्यावा, अशा विवीध मागण्यांसाठी संगणक परिचालक आज आमरण उपोषणाला बसले आहेत. मागण्या पूर्ण होणार नाही, तोपर्यंत असेच उपोषण सुरू राहणार असल्याची प्रतिक्रिया संगणक परिचालक संघाचे राज्य अध्यक्ष गुणवंत राठोड यांनी दिली.

हेही वाचा 

Back to top button