Nashik I आमदार सुहास कांदे समाज भूषण पुरस्काराने सन्मानित  | पुढारी

Nashik I आमदार सुहास कांदे समाज भूषण पुरस्काराने सन्मानित 

नाशिक (नांदगांव) : पुढारी वृत्तसेवा
नांदगांव तालुक्यातील विकासकामांसह धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रात ही भरीव योगदान देत असलेल्या आमदार सुहास कांदे यांना महानुभव पंथाकडून कर्तव्यपरायण, समाजभूषण हा जिल्हास्तरीय पुरस्कार महानुभव पंथाच्या प्रमुख महंताच्या हस्ते हिसवळ खुर्द येथे भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. सन्मान चिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
श्री.दत्त मंदिराचा ४५ वा वर्धापन दिन व श्रीमद्भगवतगीता कथा ज्ञानयज्ञ तथा संन्यास दिक्षा विधी सप्ताह सुरु आहे. या कार्यक्रमाचे सभामंडप पूजन व ध्वजारोहण आ. कांदे यांच्या हस्ते पार पडले. नाशिक जिल्हा महानुभाव समिती अंतर्गत महानुभव पंथाकडून राजकीय व्यक्तीला प्रथमच हा पुरस्कार देण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. व्यासपीठावर अमरावतीचे महंत आचार्य कारंजेकर बाबाजी हे अध्यक्षस्थानी होते. संवत्सरचे राजधर बाबाजी, नाशिकचे आचार्य भागवताचार्य चिरडेबाबा, आचार्य लांडगे बाबाजी, आचार्य श्री घुगे बाबाजी, दत्तराज व्यास पालीमकर, मुकुंदराज बाबाजी, विजय बाबा पंजाबी, कृष्णराज बाबा पंजाबी, दादेराज बाबा बिडकर, अमोल दादा कोल्हेकर, नगरपालिकेचे नगरसेवक दिनकर पाटील, माजी सभापती विलासराव आहेर, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, शाईनाथ गिडगे, राजेंद्र पवार, दत्तात्रय निकम, किशोर लहाने, राजेंद्र देशमुख, अंकुश कातकडे, अमोल नावंदर, सागर हिरे हे उपस्थित होते.
पुरस्कार स्विकारल्यानंतर आ.कांदे यांनी दत्त मंदिराला यापूर्वीच दोन सभामंडप सुपूर्त केल्याचे नमूद करून येत्या ८ ते १५ दिवसात भक्त निवासाचे काम सुरु करणार असल्याचे यावेळी जाहीर केले. उपसरपंच संजय आहेर यांनी प्रास्ताविकेत गावात एक कोटी रुपयांच्या कामांचे लोकार्पण करण्यात आल्याचे यावेळी नमूद केले. तसेच दोन कोटी २९ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले असून सुमारे सात कोटी रुपयांची कामे प्रस्तावित असल्याचे सांगितले.  प्रस्तावित तसेच सुरु असलेली सर्व कामे आमदार कांदे माध्यमातून होत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यापैकी काही कामे पूर्णत्वास आली असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाप्रसंगी राज्यभरातून सुमारे तीनशे पन्नास संत मंहत तपस्विनी उपस्थित होते. पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक येथील उत्सव समितीचे सर्व सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य देखील उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button