Radhakrishna Vikhe Patil: सोयाबीन, कापूस नुकसानीचे वास्तव्य पंचनाम्यातून मांडावे: राधाकृष्ण विखे-पाटील | पुढारी

Radhakrishna Vikhe Patil: सोयाबीन, कापूस नुकसानीचे वास्तव्य पंचनाम्यातून मांडावे: राधाकृष्ण विखे-पाटील

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यात 67 हजार सोयाबीन लागवडीचे क्षेत्र आहे. त्यापैकी 52 हजार हेक्टर शेतातील सोसाबीनचे पिक येलो मोझॅक, कुळखूज आणि मूळखूज या रोगांमुळे नष्ट झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने दिल्यानंतर आज रविवारी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील पिकांची पहाणी करण्याकरीता दौरा केला. चिमूर तालुक्यातील शेतातील पहाणी दरम्यान त्यांना ऐंशी ते नव्वद टक्के पिकांच्या नुकसानीचे वास्तव्य समोर आले. त्यांनंतर कृषी आणि महसूल विभागाला तातडीने नुकसानीचे पंचनामे पूर्ण करावे आणि पंचनाम्यातून नुकसानीचे वास्तव्य मांडावे असे तातडीनेच निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. (Radhakrishna Vikhe Patil)

चंद्रपूर जिल्या मत भातासोबतच आता सोयाबीन आणि कापसाच्या पेऱ्यात वाढ होत आहे. सध्या जिल्हाभरात एकट्या सोयाबीन पिकाची 67 हजार हेक्टर शेतात लागवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी मिळेल त्या ठिकाणावरून बियाने उपलब्ध करून सोयाबीनची पेरणी केली. नांगरणी, डवरणी, खत, निंदा यावर प्रचंड खर्च करून शेतकऱ्यांचे सोयाबीन कापसाचे पिक डौलू लागले होते. अगदी काही दिवसात ते पिके शेतकऱ्यांच्या हातात येण्याची आशा बळावली होती. मात्र अचानक अस्मानी संकट शेतकऱ्यांवर चालून आले. येलो मोझॅक, कुळखूड, मुळखूड या किडीची लागन झाली. किडीपासून शेतकरी आपले पिक वाचवू शकले नाही. अख्ये पिक डोळ्यासमोर नष्ट झाले. अस्मानी संकटामुळे शेतकरी हादरून गेल्यानंतर भरघोष मदत मिळेल या आशेचीर असतानाच आज रविवारी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा केला. चिमूर तालुक्यातील वाणगाव, रेंगाबोडी आणि बोथली या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्यानंतर त्यांना नुकसानीचे वास्तव्य पाहता आले. शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीचे गांभिर्यता त्यांना ऐकता आली. शेतकऱ्यांना मदतीची तातडीन गरज असल्याचे त्यांनी मान्य केले. (Radhakrishna Vikhe Patil)

शेतकऱ्यांच्या बांधावरील दौरा आटोपल्यांनतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, चिमूर तालुक्यातील सोयाबीन आणि कापसाचे
मोठ्या प्रमाणात क्षेत्र बाधीत झाले आहे. येलो मोझॅक सोबतच खोडकिड लागल्याचे दिसून आले. शेंगात दाणे नाहीत, कापसाला बोंड नाहीत. हे वास्तव्य आहे. शेतकऱ्यांनी बियाण्यांच्या ज्या व्हेरायटीज वापरल्या त्या बियाण्यांची रोगाशी लढण्याची प्रतिकार क्षमता कमी असल्याचे समजते. अचानक या पध्दतीने पिकांवर आलेल्या रोगांच्या निष्कर्ष आणि भविष्यातील उपाययोजनांसाठी शासनाने तर्फे अभ्यास करण्यासाठी समिती पाठविली जाईल. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची गरज आहे. या बाबत विमा कंपन्यांनी अग्रीम रक्कम देण्याकरीता 25 टक्के रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. त्यानंतर उर्वरित रक्कम पिक कापून झाल्यास देता येईल. सोयाबीन कापूस नगदी पिक आहे.. ते नष्ट झाल्याने पिक विम्याव्यतिरिक्त राज्य सरकारकडून काही वेगळी मदत करता येईल का याकरीता सरकारला निर्णय घ्यावा लागेल, असे पाटील यांनी सांगितले.

ऐंशी ते नव्वद टक्के सोयाबीन व कापसाची नुकसान झाली आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागाला नुकसानीच पंचनामे करण्याचे तातडीचे निर्देश देऊन नुकसानीचे ते वास्तव्य आहे ते पंचनाम्यातून मांडावे जे करून नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना तर मदत मिळेल परंतु ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला नाही त्यांना मदत मिळेल का ? या माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी, शेतकऱ्यांवर येणाऱ्या आपत्ती मात करण्याकरीता सरकारने पिक विमा आणला, त्याचे पैसही सरकारने भरले. परंतु काही शेतकऱ्यांनी विमा काढला नाही अशाही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नुकसानीच्या पंचनाम्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल, त्यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button