चंद्रपूर : ब्रिटीशकालीन घोडाझरी तलावाचा मुख्य कालवा पुन्हा फुटला | पुढारी

चंद्रपूर : ब्रिटीशकालीन घोडाझरी तलावाचा मुख्य कालवा पुन्हा फुटला

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : नागभीड तालुक्यातील ब्रिटीशकालीन घोडाझरी तलावाचा येनोली माल जवळील मुख्य कॅनल 55 च्या पुलिया जवळ  आज शनिवारी पहाटेच्या 4 वाजताच्या सुमारास फुटल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. पंधरा दिवसांपूर्वी याच ठिकाणी कॅनल फुटून मोठे भगदाड पडले होते. मात्र थातुरमातुर लिपापोती करून नहराला पाणी सोडण्यात आले. नागभीड ब्रिटिश कालीन घोडाझरी प्रकल्प आहे. नागभीड, नवरगाव, सिंदेवाही तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकांकरिता या प्रकल्पातून पाणी सोडले जाते.

ब्रिटिश कालीन तलावाकडे पाटबंधारे विभागाचे लक्ष आहे. परंतु पाणी वितरणिका करणाऱ्या कॅनल कडे फारच दुर्लक्ष झाले आहे. कॅनल ची योग्य तऱ्हेने आज पर्यंत दुरुस्ती करण्यात न आल्याने कॅनल कमकुवत झाला आहे. त्यामूळे दरवर्षी कॅनल ला मोठमोठे भगदाड लागतात. त्यातून पिकांचे नुकसान आणि सिंचनाची मोठी नासाडी होते.

१३ सप्टेंबर रोजी याच ठिकाणी कॅनल फुटला होता. तात्पुरत्या स्वरूपात सिमेंटच्या चुंगळ्या व पाल लावून भगदाड बुजविण्यात आला. आणि शेतीला पाणी सोडण्यात आले आहे. आज पुन्हा त्याच ठिकाणी कॅनल फुटला आहे. त्यामूळे सिंचनाची नासाडी शिवाय पिकांचे नुकसान होत आहे. सर्व शेतात वाहून जात आहे. वारंवार कॅनल फुटत असल्याने घोडाझरी पाटबंधारे विभागाविरोधात प्रचंड आक्रोश केल्या जात आहे. घोडाघरी तलावाकरिता दक्षता समिती आहे. परंतू हि समिती कागदावर आहे. त्यामूळेच घोडाझरी तलाव व कॅनल कडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची सुविधा व्हावी. या दूरदृष्टीतून इंग्रजांनी त्यांच्या कार्यकाळात ‘घोडाझरी’ या मोठया तलावाची निर्मिती केली.आणि त्या तलावाच्या कालव्यांना अनेक वितरिका जोडल्या.मात्र हया वितरिका व कालवे आता बरीच वर्ष झाल्याने कमकुवत झाले आहेत. जागो जागी भगदाड पडलेले आहे. कुठे खचलेले आहे. झाडें व कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु पाटबंधारे विभाग कुंभकर्णी झोपेत आहे. सद्या पिकांना पाण्याची गरज आहे. अश्यातच कॅनल फुटल्याने शेतकऱ्यांनी चिंता वाढली आहे.

Back to top button