चंद्रपूर: महसूलमंत्री सोयाबीन, कापूस उत्पादकांच्या बांधावर | पुढारी

चंद्रपूर: महसूलमंत्री सोयाबीन, कापूस उत्पादकांच्या बांधावर

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन आणि कापसावर लागलेल्या मोझॅक नावाचे किडीमुळे शेतातील सोयाबीन व कापसाचे पीक नष्ट झाले आहे. ऐन काढणीच्या वेळीच कीड लागल्यामुळे दोन ते तीन दिवसांतच सोयाबीन, कापूस हातचे गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. आज (दि.८) महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यातील वाणगाव, बोथली, आणि रेंगाबोडी गावातील सोयाबीन , कापूस उत्पादकांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.

या प्रसंगी शेतकऱ्यांनी, सोयाबीनच्या शेंगेला दाणे नाहीत. तर कापसाला बोंड नाही. साहेब कशी शेती करायची, उत्पादन कसे घ्यायचे, संसार कसा चालवायचा, कर्ज कसे फेडायचे, अशा शब्दांत नुकसानी आपबिती मांडली.

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर वरोरा व अन्य तालुक्यामध्ये सोयाबीनचे उत्पादन या हंगामात घेण्यात आले आहे. काही दिवसांतच पीक शेतकऱ्यांच्या हातात येणार असतानाच सोयाबीन पिकांवर मोझॅक नावाचे किडीने आक्रमण केले. पीक नष्ट झाले आहे. अगदी दोन दिवसांत पीक किडीने जमीनदोस्त केले. त्यामुळे हातातील पीक गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. एकापाठोपाठ एक येणाऱ्या संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

काही दिवसांपूर्वी कृषी विभागाच कृषी विभागाच्या चमूने येऊन केळीचे निरीक्षण केले पिकांची पाहणी केली त्यानंतर आज राधाकृष्ण विखे पाटील यांनी चिमूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन किडीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. शेतकऱ्यांसोबत संवाद साधला त्यांना सरकार मदत करण्यासाठी आपल्या पाठीशी उभा आहे, असे सांगून धीर दिला. यावेळी खासदार अशोक नेते, आमदार बंटी भांगडिया, कृषी व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सर्व प्रथम वाणगाव येथील सोयाबीन उत्पादक नथ्थू रणदिवे यांच्या शेतात महसूल मंत्री पोहचले. त्यानंतर पाटील बोथली येथील सुधाकर भरडे यांच्या कापसाच्या शेतात पोहोचले. त्यानंतर रेंगाबोडी येथील सोयाबीन उत्पादक गजानन ठोंबरे यांच्या शेतात पोहोचले. या ठिकाणी सोयाबीन पिकाची विदारक स्थिती पहायला मिळाली. येथेही शेतकऱ्यांनी महसूल मंत्र्यांना नुकसान भरपाईची मागणी केली.

हेही वाचा 

Back to top button