अमरावती : अभियांत्रिकी महाविद्यालयात शॉक लागून चौघांचा मृत्यू - पुढारी

अमरावती : अभियांत्रिकी महाविद्यालयात शॉक लागून चौघांचा मृत्यू

अमरावती : पुढारी वृत्तसेवा

शहरालगत कठोरा परिसरात असणाऱ्या माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या पोटे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराला रंगरंगोटी करणाऱ्या चार जणांना विजेचा जोरदार धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी दुपारी १२.३० वाजता ( २९ डिसेंबर) वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे महाविद्यालय परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांचा ताफा महाविद्यालय परिसरात पोहोचला. अग्निशामक दलही महाविद्यालयात पोहोचले. चारही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.

मृतांमध्ये टाकळी जहागीर येथील अक्षय साहेबराव सावरकर (वय 25), गोकुळ शालीकरामजी वाघ (वय 28), शिराळा निवासी प्रशांत सेलूकर (वय 30), शहरातील मालटेकडी निवासी संजय दंडनाईक (वय 45) यांचा समावेश आहे. चौघेही मृतक माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या कॉलेजमधील कर्मचारी आहेत. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला सकाळच्या सुमारास हे कर्मचारी रंगरंगोटी करीत होते.

दरम्यान, शिडी काढताना चार शिपायांचा जागीच विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना घडतात परिसरातील नागरिकांनी धाव घेत एकच गर्दी केली.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : जुगाडू जीप करणारे लोहार कुटुंब महिंद्रांची ऑफर स्वीकारणार का? | Kick Start Jeep

Back to top button