

पुढारी ऑनलाईन डेस्क
३१ डिसेंबरला सार्वजनिक ठिकाणी निर्बंध घातले जातील. या दिवशी सर्व हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये सर्व कोरोना प्रबिंधकाचे नियम पाळणे आवश्यक आहे. नियमांचे पालन न करणार्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज दिली. राज्यात निर्बंधाबाबत राज्य सरकार योग्यवेळी निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, वाढती रुग्णसंख्या ही तिसर्या लाटेची सुरुवात असू शकते. पण घाबरण्याचे कारण नाही कारण ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मात्र रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. माकत्र काळजी घेण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.३१ डिसेंबरला सार्वजनिक ठिकाणी निर्बंध घातले जातील.
कोरोनाच्या तिसर्या लाटेची सुरुवात असू शकेल, घाबरु नका रुग्णांची संख्या वाढणार नाही याची काळजी घ्या. हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये सर्व कोरोना प्रबिंधकाचे नियम पाळणे आवश्यक आहे. शाळा बंद करण्याचा कोणत्याही निर्णय नाही. राज्यात निर्बंधाबाबत राज्य सरकार योग्यवेळी निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचलं का?