नागपूर: ‘सिटू’तर्फे केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाची होळी | पुढारी

नागपूर: 'सिटू'तर्फे केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाची होळी

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प पुन्हा एकदा महागाई वाढविणारा, कामगार -शेतकरी – सर्व सामान्य जनतेवर बोजा लादणारा आहे. कार्पोरेट क्षेत्राला करांमध्ये सुट देणारे आहे. बेरोजगारी वाढविणारे बजेट असल्यामुळे सिटूच्या आवाहनानुसार अंगणवाडी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र व सिटू जिल्हा कमिटीतर्फे संविधान चौकात निदर्शने व बजेटची होळी करण्यात आली.

किसान सभेचे नेते व माकपाचे नागपूर जिल्हा सचिव कॉ. अरुण लाटकर म्हणाले की, केंद्र सरकारने मनरेगा, एकात्मिक महिला व बाल विकास योजना, अशा अनेक योजनांवरील खर्चात मोठी कपात केली आहे. अंगणवाडी कर्मचा-यांच्या योजनेवर २१,५०० कोटी खर्च होता. तो ३०० कोटींनी कमी केला आहे. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने खतांवरील सबसिडीत कपात करुन शेतकऱ्यांवर आघात केला आहे.

१६ फेब्रुवारीला कामगारांचा औद्योगिक बंद व संयुक्त किसान मोर्चातर्फे पुकारण्यात आलेला ग्रामीण बंदमध्ये अंगणवाडी सेविकांनी प्रचार करुन मोदींच्या नेतृत्वातील भाजपला पराभूत करण्याचा संदेश देण्याचे आवाहन केले. यावेळी सिटूचे कॉ. दिलीप देशपांडे, महासचिव, अंगणवाडीच्या नेत्या कॉ. चंदा मेंढे, कॉ. शशी काळे, अध्यक्ष, नागपूर जनरल लेबर युनियन व जेसीटीयुएचे कॉ. गुरुप्रितसिंह, एमएसएमआरएचे कों चंद्रशेखर मालवीय यांनी संबोधित केले.

कॉ. रामेश्वर चरपे, चंदा मारिया, माधुरी जामगडे, मीना पाटील, मिनाक्षी फुलझेले, प्रीती पराते, लता साठवणे, चंदा काशी, कोमल, पूर्णिमा सहारे, सविता नारनवरे, नंदेश्वर आदीं केले.

हेही वाचा 

Back to top button