शुभमन-सुदर्शनची विक्रमी भागीदारी; चेन्नईसमोर 232 धावांचे आव्हान | पुढारी

शुभमन-सुदर्शनची विक्रमी भागीदारी; चेन्नईसमोर 232 धावांचे आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्क : सामन्यात प्रथम फलंदाजी करताना शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी केलेली शतकी खेळी आणि अंतिम ओव्हरमध्ये डेव्हिड मिलरने केलेल्या 16 धावांच्या जोरावर गुजरातने तीन विकेट गमावून 231 धावा केल्या. यामध्ये शुभमन गिलने 104 तर साई सुदर्शनने 103 धावांची खेळी केली. तर गोलंदाजीमध्ये चेन्नईच्या तुषार देशपांडने 2 विकेट घेतल्या.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 231 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिलने 55 चेंडूत नऊ चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 104 धावा केल्या. तर, साई सुदर्शनने 51 चेंडूत पाच चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने 103 धावा केल्या. सुदर्शनचे हे पहिले आयपीएल शतक होते. तर, शुभमनने आयपीएल कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले. डेव्हिड मिलरने 11 चेंडूत 16 धावांवर नाबाद राहिला. तर शाहरुख खान दोन धावा करून धावबाद झाला. शुभमन आणि सुदर्शन यांच्यात 210 धावांची विक्रमी भागीदारी झाली.

डेथ ओव्हरमध्ये चेन्नईचे कमबॅक

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पहिल्या पॉवर प्लेमध्ये 58 धावा केल्या. यानंतर 7 ते 15 ओव्हरमध्ये गुजरातने एकही विकेट न गमावता 132 धावा केल्या. 15 ओव्हरपर्यंत गुजरातची धावसंख्या बिनबाद 190 धावा होती. शेवटच्या पाच ओव्हरमध्ये गुजरातला तीन विकेट गमावून 41 धावा करता आल्या.

दोन्ही संघांचे प्लेइंग -11

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, शाहरुख खान, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, मोहित शर्मा, कार्तिक

इम्पॅक्ट प्लेयर : अभिनव मनोहर, संदीप वॉरियर , बी.आर.शरथ, दर्शन नळकांडे, जयंत यादव.

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग.

इम्पॅक्ट प्लेयर : अजिंक्य रहाणे, शेख रशीद, अरावेली अवनीश, समीर रिझवी, मुकेश चौधरी.

Back to top button