नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी का बोलावली आज राष्ट्रवादीची तातडीची बैठक ?
नागपूर ; पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ग्रामीण भागात गाव चलो, महानगर पातळीवर बुथ चलो.. अभियान जोमात सुरू केलेले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटातर्फे देखील नवी रणनीती ठरवली जात असल्याची माहिती आहे. आज दुपारी पावणे बारा वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक तातडीची बैठक बोलावल्यांची माहिती असून, या ऑनलाइन होणाऱ्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, शहर प्रमुख आणि महत्त्वाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आलेले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणी लवकरच निकाल अपेक्षित आहे. दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. त्या पार्श्वभूमीवर महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका जिल्हा व मतदार संघनिहाय समीकरणे, जागा वाटपात घ्यावयाची भूमिका या दृष्टीने या चर्चेतून मागोवा घेतला जाण्याची शक्यता आहे. नागपुरात विजयगड या उपमुख्यमंत्री निवासस्थानी कार्यालय सुरू करण्यामागे यापूर्वीच विदर्भातील पक्ष संघटना मजबुतीच्या दृष्टीने लक्ष्य ठरविण्यात आले आहे हे विशेष.
हेही वाचा :