नागपुरात डेंग्यूचे ६१ रुग्ण आढळले: एकाचा मृत्यू | पुढारी

नागपुरात डेंग्यूचे ६१ रुग्ण आढळले: एकाचा मृत्यू

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपुरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहरातील 592 रुग्णांच्या तपासणीमध्ये 61 रुग्ण हे डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सर्वाधिक रुग्ण पूर्व नागपुरातील आहेत. विजय नगर भागात राहणारे जोगेशवर हिरवानी या रूग्णाचा डेंग्यू मुळे मृत्यू झाला.

डेंग्यूचे रुग्ण शहरात वाढत असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. नियंत्रण मिळवण्याचे मोठे आव्हान आहे. नागपूर शहरात आजपर्यंत आढळलेल्या ६१ पैकी अर्ध्यापेक्षा जास्त रुग्ण गेल्या महिन्याभरातील आहेत, हे विशेष. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहराच्या वेगवेगळ्या भागात कीटकनाशक फवारणीसह डेंग्यू आजाराबाबत जनजागृती सुरू करण्यात आली आहे. डेंग्यूची लक्षणे दिसताच तातडीने उपचार घेण्याचे आवाहन नागरिकांना महापालिकेचे आरोग्य अधिकारी नरेंद्र बहिरवार यांनी केले आहे.

हेही वाचा 

Back to top button