नागपूर : निर्दयी बापाला मुलांच्या हत्या प्रकरणी जन्मठेपची शिक्षा | पुढारी

नागपूर : निर्दयी बापाला मुलांच्या हत्या प्रकरणी जन्मठेपची शिक्षा

 नागपूर; पुढारी वृत्तसेवा : पत्नीच्या चारित्र्यावर संशयाने पछाडलेल्या पतीने दोन निरागस मुलांची विहिरीत ढकलून हत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी आज विद्यमान जिल्हा सत्र न्यायाधीश एस.बी . गावंडे यांनी संतोष मेश्राम या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा ठोठावली .

एम.आय.डी सी पोलीस स्टेशन परिसरात घडलेल्या या घटनेत 11 ऑक्टोबर 2018 रोजी आरोपी संतोष यांनी सकाळी सहा वाजता स्वतःच्याच मुलांना अनुक्रमे मुलगा हर्ष (वय ५ वर्ष) व दुसरा मुलगा ३ वर्ष यांना चहामध्ये विष देण्याचा प्रयन्त केला. मात्र,पत्नीच्या सतर्कतेमुळे आरोपीचा प्रयत्न फसला .त्याच दिवशी पत्नी या दोन्ही मुलांना घेवून शेजारी असणारी बहीण हिच्याकडे सोडून कामावर निघून गेली त्यानंतर आरोपी हा तिथेपण पोहचला आणि दोन्ही मुलाना पायदळ घेवून गेले. साधारणत एक किलोमिटर पायदळ घेवून मोकळ्या जागेत असलेल्या विहीरीमध्ये दोन्ही मुलांना विहीरीत ढकलून दिले आणि पायी घराकडे येत असताना त्याला पत्नी आणि भाचा मनिषने बघितले पण आरोपीला विचारणा केली तेव्हा त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. पतीनेच काळेबेरे केल्याचा संशय बळावल्याने पत्नीने पोलीस स्टेशन एमआयडीसी येथे रिर्पोर्ट दिला.त्यानंतर पोलिसांनी आरोपी विरुध्द कलम ३०२ नुसार गुन्हा नोंदवून तपास अधिकारी सुदर्शन गायकवाड यांनी आरोप पत्र दाखल केले. विद्यमान जिल्हा सत्र न्यायाधीश एस.बी .गावंडे यांच्याकडे हा खटला चालला. सहाय्यक सरकारी वकील वर्षा सायखेडकर यांनी सरकार पक्षातर्फे दहा साक्षीदार तपासले.आरोपीविरुध्द सबळ पुरावा असल्याने या निर्दयीआरोपी बापाला जन्मठेप ची शिक्षा सुनावण्यात आली. आरोपी संतोष हा पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घ्यायचा. इतकेच नव्हे तर ही दोन्ही मुले त्याची अपत्ये नाहीत असे म्हणत तो नेहमी पत्नीशी वादविवाद करीत होता यातूनच त्याच्या हातून दोन्ही मुलांची हत्या घडल्याचे तपासात पुढे आले.

Back to top button