नागपूर : पावसाने झोडपले, अनेक वस्त्या जलमय; एकजण गेला वाहून, घरांमध्ये शिरले पाणी | पुढारी

नागपूर : पावसाने झोडपले, अनेक वस्त्या जलमय; एकजण गेला वाहून, घरांमध्ये शिरले पाणी

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : बुधवर पाठोपाठ गुरुवारी देखील रात्रभर पावसाने झोपडपल्यानंतर अनेक नाल्यांना पुर आला. नरेंद्रनगर पुलाखाली पाणी साचल्यामुळे वाहतुक थांबवावी लागली. बेसा घोगली येथील नाल्यात एक व्यक्त वाहून गेला. घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिक घरातच अडकले. नविन नरसाळा येथीलही परिस्थिती बिकट होती. सोमवारपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्यानंतर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आजही दिवसभर शांत असलेल्या पावसाने रात्री अचानक जोर धरला, विजेचाही लंपडाव सुरू होता. खोलगट भागांतील परिसरांमध्ये नदीचे स्वरूप आले. सुभाननगर पारडी पावरहाऊस, नरेंद्रनगर येथील घरात पाणी शिरल्याने एक व्यक्ती घरात अडकला. शांतीनगर एमएसईबीच्या आॅफीसमध्ये पाणी शिरले, भरतवाडा रोड नवकन्यानगर येथे एक व्यक्ती अडकला. पावसाची एकूणच स्थिती बघता अनेक शाळांना सुटी देण्यात आली.

दरम्यान,पावसामुळे बेसा घोगली येथील नाल्यात एक व्यक्ती वाहून गेला. जातटारोडी येथे एक व्यक्ती नाल्यात पडला. नरेंद्रनगर येथील घरात पाणी शिरल्याने एक व्यक्ती तर भरतवाडा रोड नवकन्यानगर येथील रोडवर एक व्यक्ती अडकला. वाठोडा येथे गाय विहीरीत पडली. श्रीकृष्णनगर भवन्स शाळेजवळ, पडोळे हॉस्पीटलच्या पाठमागे एटीएमपुढे, सुयोगनगर तुकाराम सभागृह, गौरव कॉलोनी नरेंद्रनगर घरात व रस्त्यात पाणी साचले. रमन सायन्स आदर्श इंदिरा गांधी झोपडपट्टी, नेताजीनगर एस.के. ट्रेडर्स, एकता हाऊसिंग सोयायटी नरेंद्रनगर, महालक्ष्मीनगर न्यु नरसाळा रोड, श्रद्धामंगलम अपार्टमेंट, गोपालनगर जोशीवाडी येथील घरात पाणी शिरले. जगनाडे चौक जानकी अपार्टमेंट, शर्मा निवास, सिंधी कॉलोनी खामला येथील घरात, वर्धमाननगर उमिया कॉलोनी गॅस गोडाऊनच्या बाजुला, गुरूदेवनगर येथे मुख्य शहरात विविध ठिकाणी वृक्ष उन्मळून पडली.

चार जणांना केले रेस्क्यू

उमरेड रोड येथील कळमना गावात पाणी शिरल्याने घरातील चारजण हे आत अडकले. त्यांना अग्निशमन जवानांनाकडून रेस्क्यू करण्यात आले. यात विनय धवनगये (वय ४२) त्यांची पत्नी नलिनी धवनगये (वय ३२), दोन मुली पूर्वी धवनगये (वय ११) व निष्ठा धवनगये यांना सुखरूप बाहेर काढले. एका कुत्र्याचेही रेस्क्यू केले गेले.

Back to top button