अनेकांना मी गृहमंत्री म्हणून नकोय; देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर | पुढारी

अनेकांना मी गृहमंत्री म्हणून नकोय; देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : झेपत नसेल, तर गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी टीका नुकतीच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. त्याला उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले. फडणवीस आज (दि.१) नागपुरात माध्यमांशी बोलत होते.

फडणवीस म्हणाले की, मला याची कल्पना आहे की, मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली आहे. अनेकांना मनातून असे वाटतेय की मी गृहमंत्री नाही राहिलो तर बरं होईल. मात्र, जे लोक चुकीचे काम करतील, त्यांच्यावर १०० टक्के कारवाई होईल. मी आजही सांगतो, मी कुणाला घाबरत नाही, कुणाला दबत नाही. जे कायदेशीर आहे, तेच वागतो. कायद्यानेच हे राज्य चालेल आहे. शेवटी मी त्यांना एवढेच सांगू इच्छितो की, मीच गृहमंत्री राहणार आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रीपदाचा कार्यभार दिला आहे. जे जे चुकीचे काम करतील, त्यांना शासन झाल्याशिवाय राहणार नाही. गृहमंत्री म्हणून यापूर्वीही पाच वर्षं हे पद मी सांभाळले आहे. यापुढेही जे लोक अवैध काम करतील, त्यांना मी सोडणार नाही, असा इशाराही फडणवीस यांनी यावेळी दिला.

संभाजीनगरमध्ये निर्माण झालेली दंगलसदृश्य परिस्थिती आणि संजय राऊतांना आलेल्या धमकीबाबत सुप्रिया सुळेंनी गृहमंत्री पदावरून फडणवीसांवर टीका केली होती. या टीकेला फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला आहे.

हेही वाचा 

Back to top button