वर्धा : मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर पोहचले विद्रोही संमेलनात! | पुढारी

वर्धा : मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर पोहचले विद्रोही संमेलनात!

वर्धा; पुढारी वृत्तसेवा : अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या विचारधारेविरुद्ध खरेतर विद्रोहींचे साहित्य संमेलन असते. अनेकदा या दोन्ही संमेलनातील परस्पर विरोधी भूमिकांचीच चर्चा साहित्य वर्तुळात अधिक होते. मात्र, आज या दोघांमधील परस्पर सौहार्दपूर्ण संबंधाचीच चर्चा अधिक रंगली. निमित्त होते वर्धा येथील महात्मा गांधी साहित्य नगरी आणि विद्रोही साहित्य संमेलनाचे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते व दिगदर्शक नागराज मंजुळे यांनी देखील मराठी साहित्य संमेलनातील हा परस्पर सौहार्दाचा पूल आवश्यक असल्याच्या मुक्त चर्चेला भर दिला.

९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माजी न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी आज शनिवारी (दि. ४) वर्धामध्ये आयोजित विद्रोही साहित्य संमेलनाला भेट दिली. अनेकदा या दोन्ही संमेलनातील परस्पर विरोधी भूमिकांचीच चर्चा खूप होते. परंतु, नरेंद्र चपळगावकर यांनी याला फाटा दिल्याचे पहायला मिळाले. ते स्वत: आजपासून सुरू झालेल्या द्विदिवसीय संमेलनासाठी विद्रोहींच्या मांडवात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत प्रसिद्ध समाजसेवक डॉ. अभय बंग हे देखील उपस्थित होते. विद्रोही साहित्य संमेलनाच्या आयोजकांकडून यावेळी चपळगावर यांचे स्वागत करण्यात आले. आज या परस्परविरोधी विचारांच्या एकत्रित विचारांनीच चर्चा रंगली हे विशेष.

हेही वाचा

Back to top button