मुख्यमंत्री शिंदे यांनी सेवाग्राम येथील बापूकुटीस भेट देऊन महात्मा गांधीजींना अभिवादन केले. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार डॉ. पंकज भोयर, भंडाराचे आमदार नरेंद्र बोंडेकर, नागपूर विभागाचे विशेष पोलिस महानिरिक्षक छेरींग दोरजे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन उपस्थित होते.