हिंगोली : पिस्तुलीचा धाक दाखवत खडेश्वर बाबा मठात महंतांना लूटले | पुढारी

हिंगोली : पिस्तुलीचा धाक दाखवत खडेश्वर बाबा मठात महंतांना लूटले

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : हिंगोली येथील खडेश्वर बाबा मठामध्ये पिस्तुलीच्या धाकाने सोन्याच्या अंगठ्या चोरल्याचा धक्कादायक प्रकार आज (दि.२६) सकाळी उघडकीस आला. तिघे चोरटे महंतांना पिस्तूलाचा धाक दाखवत सोन्याच्या अंगठ्या घेऊन पसार झाले. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

यवतमाळ : दारूसाठी मंदिरातील दानपेटी फोडणारा अटकेत 

हिंगोलीतील खटकाळी भागामध्ये खडेश्वरबाबा यांचा मठ आहे. या ठिकाणी महंत सुमेरपुरी महाराज मठाचे कामकाज बघतात. बुधवारी रात्री सुमेरपुरी महाराज राम करत होते. रात्री अकराच्या सुमारास तीन चोरटे मठाच्या पाठीमागील भागातून आत आले. त्यातील एकाने महंत सुमेरपुरी महाराज यांच्यावर पिस्तूल रोखून तिजोरीच्या चाव्या मागितल्या. महंतांनी चाव्या दिल्यानंतर तिजोरीतील सोन्याच्या तीन ते चार अंगठ्या घेवून चोरटे पसार झाले. आज सकाळी या घटनेची माहिती हिंगोली शहर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

हेही वाचा :

Back to top button