IMD Weather : राज्यातील पुढचे काही दिवस पुन्हा थंडीचे, पश्चिम हिमालयात जोरदार बर्फवृष्टीचा इशारा | पुढारी

IMD Weather : राज्यातील पुढचे काही दिवस पुन्हा थंडीचे, पश्चिम हिमालयात जोरदार बर्फवृष्टीचा इशारा

पुढारी ऑनलाईन : वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव पुन्हा एकदा उत्तर भारतात जाणवणार (IMD Weather) आहे. पश्चिम हिमालयात पुढचे काही दिवस काही प्रमाणात हलका पाऊस किंवा बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच, २९ ते ३० जानेवारी दरम्यान संपूर्ण पश्चिम हिमालयात जोरदार पाऊस किंवा बर्फवृष्टी तर वायव्य भारतील मैदानी प्रदेशात हलक्या मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. आजपासूनच पश्चिम हिमालयात हलका पाऊस किंवा बर्फवृष्टी होणार आहे. हा प्रभाव १ फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.

पुढे २८ जानेवारीपर्यंत वायव्य भारतातील किमान तापमान ३ ते ५ अंशाने घसरणार आहे. त्यानंतर पुन्हा किमान तापमानात वाढ (IMD Weather) होणार आहे. मध्य प्रदेशातील किमान तापमान २ ते ४ अंशाने घटणार असून, पुन्हा ते वाढणार आहे. यामुळे वायव्य भारतात पुन्हा थंडी जाणवणार आहे. संपूर्ण द्वीपकल्पीय बेटांवर काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे. तर देशाच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहणार असल्याची माहिती हवमान विभागाने दिली आहे.

IMD Weather MH : राज्यात थंडी वाढणार

२९ जानेवारीपर्यंत राज्यातील किमान तापमानात कोणत्याही प्रकारे बदल होणार नाही. २९ पर्यंत राज्यातील तापमान स्थिर राहणार आहे. त्यानंतर पुढचे दोन दिवस किमान तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होऊन थंडी काही प्रमाणात ओसणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button