यवतमाळ : दारूसाठी मंदिरातील दानपेटी फोडणारा अटकेत  | पुढारी

यवतमाळ : दारूसाठी मंदिरातील दानपेटी फोडणारा अटकेत 

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : घाटंजी तालुक्यातील सावरगाव (मंगी) येथील महाकाली मंदिरात चोरी करणाऱ्यास पारवा पोलिसांनी २४ तासात अटक केली. चोरटा दारू पिण्याकरिता मंदिरातील दानपेट्या फोडत होता. त्याने एकूण तीन ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. हनुमान रामदास ढोले (४०, रा. मानोली, ता. घाटंजी) असे आरोपीचे नाव आहे.

सावरगाव येथील महाकाली मंदिरातून चांदीचे दागिने चोरीस गेल्याची  घटना २४ जानेवारीच्या मध्यरात्री घडली. याप्रकरणी पुजारी कालिदास अरगुलवार यांच्या तक्रारीवरून पारवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेत असताना ढोले हा संशयितरित्या फिरताना आढळून आला. त्याला ताब्यात घेतले असता त्याने चोरीची कबुली दिली.

ही कारवाई पारवा पोलिस ठाण्यातील ठाणेदार विनोद चव्हाण, बालाजी ससाणे, अविनाश मुंडे, अनिल गुनगुले, अमोल वाढई, सचिन पोशी, राहुल राठोड, रंजना वाडगुरे यांनी केली. त्यांना अजय शेंडे, राम शेंडे, विशाल शेंडे, सुरेश शेंडे, सतीश कामटकर यांनी सहकार्य केले.

 हेही वाचा :

Back to top button