गणेशवाडीत हातात बेड्या घालून चोरीचा प्रयत्न; आरडाओरोड केल्याने चोरटे पळाले

गणेशवाडीत हातात बेड्या घालून चोरीचा प्रयत्न; आरडाओरोड केल्याने चोरटे पळाले

सोनई(ता. नेवासा); पुढारी वृत्तसेवा : सोनई जवळील गणेशवाडी येथे रविवारी (दि.22) डौले वस्तीवर चोरट्यांनी घर मालकाला तोंडावर पिशवी व हातात बेड्या घालून चोरी करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी आरडाओरोड केल्याने चोरट्याने तिथून पळ काढला. याबाबत सोनई पोलिस ठाण्यात अनिता किशोर डौले यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादित म्हंटले की, रविवारी घरात प्रवेश करून जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने किशोर डौले यांच्या तोंडावर पिशवी व हाताला लोखंडी बेडी लावून गळ्यातील चैन बळजबरीने चोरून नेण्याचा प्रयत्न केला.

यावेळी शेजारील लोकांनी आरडाओरड केल्याने चोरट्यांनी तिथून पळ काढला. ही माहिती मिळताच सोनई पोलिस ठाण्याचे पथक तेथे पोहचले, पोलिसांनी व ग्रामस्थांनी चोरट्यांचा रात्रभर शोध घेतला;परंतु चोरटे पसार झाले होते. या फिर्यादीवरून सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेने गणेशवाडी परिसरात घबराट पसरली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news