पुढारी ऑनलाईन डेस्क: लोकसभा निवडणुकीचा देशभरात आज शुक्रवारी (दि.२६) दुसरा टप्पा पार पडत आहे. दरम्यान सकाळच्या टप्प्यात ९ वाजेपर्यंत ७.४५ टक्के मतदान झाले आहे. या संदर्भातील वृत्त राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने दिली. यापूर्वी शुक्रवारी (दि.१९ एप्रिल) लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला होता. (Lok Sabha Election)
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज (दि.२६) महाराष्ट्रासह १३ राज्यात होत आहे. दरम्यान राज्यातील ८ मतदान संघात आज मतदान होत आहे. आज सकाळी ९ वाजेपर्यंत कोणत्या मतदार संघात किती टक्के मतदान झाले आकडेवारी पुढीलप्रमाणे, (Lok Sabha Election)
वर्धा : ७.१८ टक्के
अकोला : ७.१७ टक्के
अमरावती : ६.३४ टक्के
बुलढाणा : ६.६१ टक्के
हिंगोली : ७.२३ टक्के
नांदेड : ७.७३ टक्के
परभणी : ९.७२ टक्के
यवतमाळ-वाशिम : ७.२३ टक्के