राज्यात उद्योग येणार, रोजगार मिळणारच: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

राज्यात उद्योग येणार, रोजगार मिळणारच: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : पूर्व विदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौ-यावर आले होते. यावेळी माध्यमांशी त्‍यांनी संवाद साधला. शिंदे म्‍हणाले आमच्याकडे जादूची कांडी नाही की एक दोन दिवसात उद्योग येतील. कुठलाही उद्योग असा झटपट येत किंवा जात नाही. राज्यात उद्योग येणार, रोजगार मिळणारच याविषयीची हमी राज्य सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना निरुत्तर केले.

पुढे बोलताना ते म्‍हणाले, काम नसल्यानेच विरोधकांची आंदोलने सुरू आहेत. गेल्या चार महिन्यात 2 लाख कोटींची 225 कामे केंद्राने मंजूर केली आहेत. अडीच वर्षे कामे खोळंबली होती, काम असा आरोप करीत आमची कामे जनतेला दिसतील असा दावाही केला.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्यावरील पोलीस कारवाई नियमानुसारच आहे. यात कुठलाही राजकीय हस्तक्षेप नाही असे त्यांनी सांगितले. नागपूर ते शिर्डी या समृद्धी मार्गाचे लवकरच लोकार्पण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार कृपाल तुमाने, किरण पांडव उपस्थित होते.

राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांच्यात देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्याविषयीचे विधान केले याबद्धल विचारले असता मुख्यमंत्र्यांनी संजय राऊत मोठे नेते आहेत…’ असा टोमणा मारला. माजी खासदार ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांच्या अनुभवाचा आम्हाला, राज्याला फायदाच होईल असे ते म्‍हणाले.

हेही वाचा  

सोलापूर : मोहोळ ते पंढरपूर मार्गावर कार-बसचा अपघात; तीन ठार

आता एकनाथ खडसेंचे कारनामे बाहेर येणार; गिरीश महाजन यांचा इशारा

पिंपरी: न्यूमोनियाची रुग्णसंख्या घटली, कोरोना काळात वाढला होता रुग्णसंख्येचा आकडा

Back to top button