कला क्षेत्रात मुस्लिमांचे सर्वाधिक योगदान : शरद पवार | पुढारी

कला क्षेत्रात मुस्लिमांचे सर्वाधिक योगदान : शरद पवार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : कला क्षेत्रातमध्ये सर्वाधिक योगदान मुस्लिम अल्पसंख्याक समाजाचे आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. ते नागपुरामधील मुस्लिम इंटेलेक्चुअल फोरमच्या एका कार्यक्रमात बोलत होते. मुस्लिम इंटलेक्चुअल फोरमच्या वतीने शरद पवारांना मुस्लिम समाजाच्या काही समस्यांचे निवेदन देण्यात आले. यावर बोलताना शरद पवार यांनी सांगितले की, मुस्लिम समाजाच्या समस्या किंवा प्रश्न यावर पंधरा मिनिटाच्या भाषणात अथवा दोन तीन तासाच्या बैठकीत तोडगा निघू शकत नाही. दोन तीन आठवड्यात पुन्हा एक बैठक घ्या. मी या बैठकीत येण्यास तयार असल्याचे पवार यांनी सांगितले. या कार्यक्रमात शरद पवार यांनी मुस्लिम अल्पसंख्याक आणि उर्दू भाषेचे कौतुकही केले.

शरद पवार म्हणाले की, कला क्षेत्रात मुस्लिम समाजाचे योगदान अवर्णनीय आहे. महाराष्ट्र आणि मुंबई शहरासह जगभरातील लोकांना बॉलीवूड माहित आहे. बॉलिवूडमध्ये सर्वाधिक योगदान मुस्लिम अल्पसंख्याक समाजाचे आहे. कलेच्या या क्षेत्रात कोणी प्रगती करण्याचा प्रयत्न केला आहे, या सर्व गोष्टी आपल्या समोर दिसत आहेत. यात सर्वाधिक योगदान मुस्लिम अल्पसंख्याकांचे आहे, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कला असो, लेखक असो, कवी असो या विभागांमध्ये योगदान देण्याची सर्वाधिक ताकद आज आपल्या देशात अल्पसंख्यकांमध्ये आहे.

मुस्लिम अल्पसंख्याक आणि उर्दू भाषेत हे सामर्थ्य आहे. तसेच शिक्षण आणि बेरोजगारीच्या बाबतीतही ते म्हणाले की, एखाद्या नोकरीच्या संधीची निवड करताना सरकारकडून जर ५० जणांची निवड करण्यात आली, तर या ५० जणांमध्ये लोकसंख्येच्या तुलनेत अल्पसंख्यक समाजाचे उमेदवार नगण्य असतात. या करीता निवड समितीतील सदस्यांचे विचार बदलण्याची गरज असल्याचे पवार यांनी सांगितले.

हेही वाचलंत का?

Back to top button