अमरावती : अश्लील कृत्य करताना प्रेमीयुगलांना पकडले | पुढारी

अमरावती : अश्लील कृत्य करताना प्रेमीयुगलांना पकडले

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : शहरातील कॅफेमध्ये अश्लील कृत्यांसाठी तासाभराचे शुल्क आकारून कॅबिन उपलब्ध करून देण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सीटी मॉलमध्ये सीपींच्या विशेष पथकाने काही दिवसांपूर्वीच कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी शहरातील सर्व कॅफेवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी नांदगाव पेठ आणि गाडगेनगर येथील कॅफे आणि हॉटेलवर छापे टाकण्यात आले होते. अशातच गाडगेनगर पोलिसांनी रविवारी रात्री (दि.५ सप्टें) ११.३० वाजता कठोरा मार्गावरील कमल रेसिडेन्सीच्या बंद फ्लॅटवर छापा टाकून मैत्रिणीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले होते.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन तरुण व त्यांना फ्लॅट उपलब्ध करून देणारे अशा चौघांविरुध्द कारवाई केली. यामध्ये प्रवीण रतनसिंग खानंदे (वय ३०, रा. भातकुली), अभय रतनसिंग खानंदे (२८, भातकुली), ऋतिक संजय सिरसाट (२०, शोभा नगर) आणि अभिषेक हरिचंद्र साळंखे (२१, वृंदावन कॉलनी, मूर्तिजापूर) या तरुणांचा समावेश आहे. पोलिसांना गोपनीय माहितीवरून येथील फ्लॅट क्रमांक ३ मध्ये काही जोडपी अश्लील कृत्य करत आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गाडगेनगर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात पीएसआय सचिन माकोडे यांनी पोलिस बलासह छापा टाकला. त्यावेळी फ्लॅटमध्ये चार प्रेमीयुगल आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी चार तरुणांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button