Liz Truss : परिचारिकेच्या मुलीचा संघर्षमय प्रवास; दोन पराभव पचवून थेट पंतप्रधानपदी झेप | पुढारी

Liz Truss : परिचारिकेच्या मुलीचा संघर्षमय प्रवास; दोन पराभव पचवून थेट पंतप्रधानपदी झेप

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानांची घोषणा करण्यात आली आहे. लिज ट्रस (liz truss) ब्रिटनच्या नवीन पंतप्रधान बनल्या आहेत. मार्गारेट थॅचर आणि थेरेसा यांच्यानंतर त्या ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान बनल्या. नवीन पंतप्रधानांची घोषणा सर ग्रॅहम ब्रॅडी यांनी केली. ब्रॅडी हे कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतृत्व निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी आहेत. लिज ट्रस यांना 81,326 मते मिळाली तर ऋषी सुनक यांना 60,399 मते मिळाली. या घोषणेनंतर ट्रस यांनी, पंतप्रधानपदी निवड होणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी सर्व लोकांचे आभार मानते. मी कंझर्व्हेटिव्ह पक्षाची तत्त्वे पुढे नेईन, अशी भावना व्यक्त केली.

कोण आहेत लीज ट्रस ?

47 वर्षांच्या ट्रस यांनी बोरिस जॉन्सन सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला. गेल्या २२ वर्षांपासून त्या राजकारणामध्ये सक्रीय आहेत. कंजर्वेटिव्ह पार्टीमध्ये येण्याआधी त्या लिबरल डेमोक्रेट्स सोबत होत्या. त्यांचा जन्म ऑक्सफोर्डमध्ये झाला आणि त्या लंडनमध्ये राहतात. एका परिचारिकेच्या मुलीचा हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. ट्रस या गणिताच्या प्राध्यापक होत्या. ह्यू ओ’लेरी (Hugh O’Leary) यांच्या सोबत त्या विवाहबद्ध झाल्या. ट्रेस यांना दोन मुली आहेत.

ट्रस यांच्या भावाने एका मुलाखतीदरम्यान म्हटले की, ट्रस या लहानपणापासूनच जिंकण्याची जिद्द बाळगत असायच्या. त्यांनी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये तत्वज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांमध्ये पदवी प्राप्त केल्या आहेत. विद्यार्थी दशेत असल्यापासूनच त्या राजकारणामध्ये सक्रीय आहेत. त्यांनी त्याच्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात ही लिबरल डेमोक्रेट्समधून केली. पण त्यांनी कंजर्वेटीव्ह पार्टासोबत जात पक्षांतर केले. ट्रस यांचा सुरूवातीला राजेशाहीला विरोध होता.

ट्रस यांचे करिअर कसे होते ?

लीज ट्रस यांच्या राजकीय कारकिर्दी बाबत बोलायचं झालं तर २००१ पासून त्या निवडणूकीच्या रिंगणामध्ये उतरल्या. पण या पहिल्या वेळेस त्यांचा पराभव झाला. २००५ मध्ये देखील त्यांना पुन्हा पराभव पत्करावा लागला. २००८ मध्ये त्यांनी राईट ऑफ सेंटर रिफॉर्म थिंक टँक या संस्थेसाठी मोलाचं योगदान दिलं. २०१० मध्ये संसद सदस्य बनल्या यामुळे त्या राजकारणामध्ये चर्चेत आले. २०१० च्या विजयानंतर २०१२ मध्ये त्या शिक्षणमंत्री म्हणून कार्यरत राहील्या. २०१४ मध्ये पर्यावरण सचिव हा पदभार स्विकारला. ट्रस या ब्रेक्झिटच्या घडामोडी दरम्यान देखील चर्चेत होत्या. त्यावेळी बोरिस जॉन्सन हे ब्रेक्झिटच्या घडामोडी दरम्यान मोठे नेते होते. २०१९ च्या दरम्यान बोरीस जॉन्सन हे  पंतप्रधान बनले त्यावेळी ट्रस यांनी व्यापार सचिव पदावर काम केले.

हेही वाचा

Back to top button