Solapur Lok Sabha: सोलापुरात सुशिलकुमार शिंदेंना चौथ्यांदा पराभवाचा सामना करावा लागेल : सुभाष देशमुख | पुढारी

Solapur Lok Sabha: सोलापुरात सुशिलकुमार शिंदेंना चौथ्यांदा पराभवाचा सामना करावा लागेल : सुभाष देशमुख

मंद्रुप, पुढारी वृत्तसेवा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौफेर विकास करून देशाला स्वावलंबी बनविल्याने जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. भाजपचे उमेदवार राम सातपुते उपरा म्हणून विरोधकांकडून जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे. दक्षिणच्या मतदारांनी तीन वेळा शिंदे घराण्याला नाकारल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी लोकसभेसाठी उमेदवारी दाखल करून मतदारांचा अपमान केला आहे. त्यामुळे चौथ्या वेळीही शिंदे यांना पराभवाचा सामना करवा लागेल, असे आमदार सुभाष देशमुख यांनी म्हटले आहे. मंद्रुप येथील प्रचारसभेत ते बोलत होते. Solapur Lok Sabha

यावेळी सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते, प्रदेश उपाध्यक्ष विकास भेंडे, हणमंत कुलकर्णी, डॉ. चनगोंडा हविनाळे, अप्पासाहेब पाटील वडकबाळकर, हेमंतकुमार स्वामी, मळसिध्द मुगळे, गौरीशंकर मेंडगुदले, विश्वनाथ हिरेमठ, यतीन शहा, शिवपुत्र जोडमोटे, शिवानंद लोभे, नितीन रणखांबे, सुरेश टेळे, दयानंद खाडे, अंबिका पाटील, संगप्पा केरके, संदिप टेळे, प्रशांत कडते, शिवराज कालदे आदी उपस्थित होते. Solapur Lok Sabha

Solapur Lok Sabha : सुशिलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर दक्षिणचा विकास केला नाही.

यावेळी सातपुते म्हणाले की, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर दक्षिणचा विकास केला नाही. मतदारांना पाणी उपलब्ध करून दिले नाही . काँग्रेसने हिंदू अस्मिता असणार्‍या रामाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केल्याने राममंदिर रक्षण व वैभवशाली इतिहास जोपासण्यासाठी मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधान होणे आवश्यक आहे. मतदारांनी हिंदू व भगव्यांला आतंकवाद म्हणणार्‍यांना धडा शिकविण्यासाठी भाजपाला विजयी करावे.

सत्तर वर्षे देश लुटून दक्षिण तालुक्याला विकासापासून वंचित ठेवणार्‍यांना धडा शिकवा. सर्व राज्यांनी टाकून दिलेला एनटीपीसी प्रकल्प आणून विकासाच्या गप्पा मारण्यात येत आहे. सोलापूरमध्ये विकासगंगा आणण्यासाठी भाजपला विजयी करण्याचे आवाहन सातपुते यांनी यावेळी केले .

मळसिध्द मुगळे यांनी प्रास्ताविक केले. शिवपुत्र जोडमोटे यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा 

Back to top button