गडचिरोली : कोरची येथे शेतकऱ्यांनी केले चक्काजाम आंदोलन | पुढारी

गडचिरोली : कोरची येथे शेतकऱ्यांनी केले चक्काजाम आंदोलन

गडचिरोली, पुढारी वृत्‍तसेवा : धान खरेदी, कृषिपंप आणि अन्य मागण्यांसंदर्भात शासनाचे लक्ष द्यावे यासाठी बुधवारी (दि. ०१) कोरची तालुक्यात शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले.

या आहेत मागण्या

  • रबी हंगामात एकरी १७ क्विंटल धान्य खरेदी करावेत.
  • बेतकाठी व बेळगाव या दोन गावांसाठी ८ हजार क्विंटल धान्य खरेदीची परवानगी द्यावी.
  • खरीप हंगामातील धान्याचे बोनस तत्काळ अदा करावे.
  • डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ कृषिपंपाची जोडणी द्यावी.  अशा विविध मागण्यांसाठी शेतक-यांनी आंदोलन केले.

यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी, महावितरणचे कनिष्ठ अभियंता या अधिका-यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. परंतु शेतकरी आपल्या मागण्यांवर अडून होते. यानंतर शेतक-यांच्या मागण्या चार दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले.

या आंदोलनात नंदकिशोर वैरागडे, सुरेश काटेंगे, रामसुराम काटेंगे, अशोक गावतुरे, केशव लेनगुरे, आसाराम शेंडे, सियाराम हलामी, रंजित बागडेरिया, भाऊराव मानकर, मेहरसिंग काटेंगे, सुनील सयाम, रुपेश गंगबोईर, रुपराम देवांगण, धनिराम हिडामी, सुखराम राऊत, महोदवे बन्सोड, रामाधिन ताराम, तुलसीदास मडी, शंकर जनबंधू यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.

हेही वाचा  

Back to top button