पडळकरांच्या अडचणी वाढल्या; कर्जत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल | पुढारी

पडळकरांच्या अडचणी वाढल्या; कर्जत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

कर्जत : पुढारी वृत्तसेवा

भाजप आमदार पडळकर यांच्याविरोधात कर्जत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. विशेष म्हणजे कर्जत तालुक्यातील धनगर समाजातीलच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आज (बुधवारी) लेखी तक्रार अर्ज देऊन पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

गडचिरोली : ७५ वर्षीय वृद्धेचा उष्माघाताने मृत्यू

या तक्रारी अर्जावरून आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले म्हणून भादवि कलम 505 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार अर्जावर रविंद्र सखाराम पांडुळे, अंगद रुपनर, महेश काळे, विजय पावणे, तानाजी पिसे, सागर मदने, चंद्रकांत खरात, व लहू रुपनर यांची नावे व सह्या आहेत.

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीचे समन्स

पडळकर यांनी कर्जत तालुक्यातील बेनवडी फाटा व चापडगाव येथे काल (मंगळवारी) पत्रकारांशीबोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, आमदार रोहित पवार यांच्यासह चौंडी येथे आलेल्या अनेक मंत्री व इतर सन्माननीय व्यक्तींबद्दल अपशब्द वापरले, त्यामुळे त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येस बँक-डीएचएफएल घाेटाळा प्रकरण : अविनाश भोसले यांना सीबीआयने चौकशीसाठी दिल्लीला आणले

या तक्रारी अर्जामध्ये पुढे म्हटले आहे की, गोपीचंद पडळकर यांनी कर्जत तालुक्यातील बेनवड फाटा व चापडगाव या ठिकाणी बोलताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी या जन्मगावी येऊन शरद पवार व आमदार रोहित पवार व इतरांना या ठिकाणी जयंती साजरी करण्याचा काय अधिकार आहे. आजोबा व नातू यांच्या छाताडावर आमची पोरं नाचतील. तसेच पवार यांनी जयंती मध्ये राजकारण केले आहे, हे करताना त्यांनी आमच्या पन्नास-साठ वर्षांपासून अनेक पिढ्यांच नुकसान केले आहे. या वयात आजोबा आता नातवाला पुढे करत असून, ते आमच्या आणखी पाच पिढ्या नष्ट करतील, अशा पद्धतीने अनुद्गार काढले होते.

Back to top button