Bhiwandi Lok Sabha: भिवंडीची जागा काँग्रेसला न मिळाल्यास सामूहिक राजीनामे देणार; बदलापूर पदाधिकाऱ्यांची भूमिका  | पुढारी

Bhiwandi Lok Sabha: भिवंडीची जागा काँग्रेसला न मिळाल्यास सामूहिक राजीनामे देणार; बदलापूर पदाधिकाऱ्यांची भूमिका 

बदलापूर: पुढारी वृत्तसेवा: कोकण विभागातील सात लोकसभा मतदारसंघातील फक्त भिवंडी हा पारंपरिक मतदार संघ काँग्रेस पक्षाकडे आहे. आघाडीतील इतर घटक पक्षांकडे आजूबाजूचे मतदारसंघ असताना काँग्रेस या जागेवर आत्तापर्यंत एकूण आठ वेळा खासदारकीचे उमेदवार निवडून आले आहेत. असे असतानाही फूट पडलेल्या राष्ट्रवादीने भिवंडी लोकसभा मतदारसंघावर दावा सांगून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. जर काँग्रेसच्या वरिष्ठांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडला, तर आम्ही पक्षाविरोधात असहकाराची भूमिका घेऊ, असे इशारा बदलापूर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. Bhiwandi Lok Sabha
यावेळेस बदलापूर आणि ठाणे जिल्ह्यातील विविध पदाधिकारी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातून आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता असतानाच हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला जाण्याची भीती स्थानिक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना वाटत आहे. विद्यमान खासदार कपिल पाटील यांची सुपारी घेऊन राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे ज्यांनी चार पक्ष फिरून आले आहेत. अशा उमेदवाराच्या पाठीशी ताकद लावून हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडून काढून घेत असल्याचा आरोपही संजय जाधव यांनी केला. हा मतदारसंघ काँग्रेसकडून काढून घेतल्यास या भागातून काँग्रेस पक्ष नामशेष होईल, असा इशाराही स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांना दिला आहे. एकूणच तिकीट वाटपावरून काँग्रेस आघाडीत असलेला अंतर्गत वाद निवडणुकीच्या तोंडावर उफाळून येत आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडून गेल्यास कोकण विभागातील सर्व काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी पदाधिकारी सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत असल्यासही जाधव यांनी सांगितले.    Bhiwandi Lok Sabha

Bhiwandi Lok Sabha : आयाराम गयाराम उमेदवारासाठी शिल्लक राष्ट्रवादीने दावा करणं चुकीचे

भिवंडी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरचंद्र पवार गटाने दावा केला आहे. राष्ट्रवादीचा 80 टक्के भाग अजित पवार यांनी पळवून नेला असून उरली सुरली २० टक्के राष्ट्रवादी शरद पवारांबरोबर उरली असून सध्या उमेदवार म्हणून गुडघ्याला बाशिंग लावलेले सुरेश (बाळ्या मामा ) म्हात्रे हे सहा पक्ष बदलून आता पुन्हा राष्ट्रवादीकडून तिकीट मागत आहेत. अशा आयाराम गयारामाला आम्ही कोणत्याही प्रकारे मदत करणार नाही असा घडाघातही काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव यांनी केला. तसेच काँग्रेसच्या वरिष्ठांनी आमचे म्हणणे ऐकले नाही, तर आम्ही वेगळी भूमिका घेऊ तसेच काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्त्याने अपक्ष निवडणूक लढवल्यास त्याच्यामागे आम्ही आमची ताकद उभी करु, असे संजय जाधव यांनी सांगितले.
हेही वाचा 

Back to top button