तुझे माझे जमेना, तुझ्यावाचून करमेना; काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह | पुढारी

तुझे माझे जमेना, तुझ्यावाचून करमेना; काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  ठाण्यात काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने मांडलेल्या अदानी समर्थनाच्या भूमिकेला जोरदार आक्षेप घेतला. अदानी आणि पंतप्रधानांचे काय संबंध आहेत? आयुर्विमा आणि स्टेट बँक यांचे पैसे अदानी समुदायाला का दिले? असे मुद्दे उपस्थित करत बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशी केलेल्या हात मिळवणीच्या मुद्यावरही काँग्रेस नेत्यांनी जोरदार नाराजी व्यक्त केली आहे.

या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण हे नेते एकत्र आले होते. मात्र त्याचवेळी काँग्रेसचे काही आमदार महाराष्ट्रात नव्याने येत असलेल्या के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात होते, दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे काही नेते भाजपाच्या संपर्कात असल्याचेही सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्येच असलेला संशयकल्लोळ आणि दुसऱ्या बाजुला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या भूमिकांमुळे निर्माण झालेली वैचारिक दरी याचे पडसाद या बैठकीवर पडल्याचे दिसत होते

खरंतरं के. चंद्रशेखर राव हे महाराष्ट्रात उडी घेत आहेत. आघाडीच्या मतांमध्ये विभागणी करायची असेल तर दुसराच समविचारी पक्ष स्पर्धेत असणे आवश्यक असते. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत वंचित आघाडीने हे काम केले होते आता तेच काम राव यांचा पक्ष करेल, अशी भाजपची धारणा असल्याचे या बैठकीच्या निमित्ताने चर्चा ऐकायला मिळत होती, दुसऱ्या बाजुला विरोधकांची मोट बांधताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांची आघाडी झाली आहे खरी मात्र अलिकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रसने राहूल गांधी यांच्या भूमिकेशी परस्परविरोधी भूमिका अनेक मुद्द्यांमध्ये घेतली. एवढेच नव्हे तर नागालँडमध्ये भाजपला न मागताचा पाठिंबा दिला. त्यामुळे आघाडीत याबाबत अस्वस्थता पसरलेली पहायला मिळत आहे असे असताना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसने अदानी प्रेम व्यक्त केल्याने यात अधिक भर पडली आहे. ठाण्याच्या काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत याचे पडसाद उमटणे स्वाभाविक ठरले. पुढील सत्तेसाठी एकत्रित आलेले हे पक्ष आतून मात्र दुखावले गेल्याचे या बैठकीच्या निमित्ताने पुढे आले. तरीही पुढील सत्तेच्या समिकरणांसाठी तुझे माझे जमेना… तुझ्यावाचून करमेना अशी भूमिका है। दोन्ही पक्ष घेताना दिसत आहेत. आघाडी एकत्र आली तर त्यांना लोकसभेच्या ३८ जागा मिळतील असे सर्वेक्षण आहे.

आघाडीतील ही अस्वस्थता, भविष्यातील एकवाक्यतेला बाधा

सध्या काँग्रेसने राष्ट्रवादीच्या भूमिकेवर सावध पाउले उचलण्याचे ठरवले आहे तरीही आघाडीमधील विश्वासालर मात्र तडा जाताना दिसत आहे. काँग्रेसने सध्या शेतकऱ्यांचा प्रश्न तसेच राज्य सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे होणारे परिणाम, रिक्त असलेली जवळपास ३ लाख पदे न भरता आउटसोर्सिंगने कर्मचारी घेण्याचा घेतलेला मुद्दा हे सर्व विषय उचलून धरण्याचे काँग्रेसने ठरवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने काही वेगळा निर्णय घेतला तर वंचित आघाडीशी हातमिळवणी करुन मिळवण्याचा मार्ग उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मनात आहे. त्यामुळे आघाडीतील ही अस्वस्थता भविष्यातील एकवाक्यतेला बाधा आणण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विचारभिन्नतेमुळे त्यांच्यातील मतभेदाची दरी

एका बाजुला महायुती ही एकत्र येत असताना दुसऱ्या बाजुला आघाडीमधील विचारभित्रता समोर येत असल्याने महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमांवर एकत्र येणार का? हा मोठा प्रश्न आहे. यासाठी आखली जाणारी रणनिती किती यशस्वी होते हे पहावे लागेल. एका बाजुला आपली राजकीय ताकद दाखवण्यासाठी आघाडीतील तीन्ही पक्षांना एकत्र राहणे आवश्यक असल्याने एकमेकांची गरज म्हणून हे पक्ष एकत्र राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. तर दुसन्या बाजुला विचारभित्रतेमुळे त्यांच्यातील मतभेदाची दरी वाढत आहे. यातून पुढचा मार्ग खडतर होतो की सुखकारक ठरणार हे पुढचा काळच ठरवेल.

Back to top button