कल्याणमध्ये 25 लाखांच्या गुटखा जप्‍त, तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेडय़ा | पुढारी

कल्याणमध्ये 25 लाखांच्या गुटखा जप्‍त, तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेडय़ा

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकातून गुटख्याने भरलेला कंटेनर उल्हासनगर येथे पोहचणार असल्याची खबर पोलिसांना मिळली. ही बातमी मिळताच डीसिपी स्कॉडने 25 लाख रुपये किंमतीचा गुटखा तस्करी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. हा गुटखा नक्की कोणाचा आहे, याचा शोध  पोलिस घेत आहेत.

कल्याण डोंबिवलीत उल्हासनगर आणि अंबरनाथ बदलापूरसह इतर भागात उघडपणे विकला जातो. कल्याण डोंबिवलीतील पोलिसांनी ठिकठिकाणी छापे टाकून गुटखा जप्त करीत विक्री करणाऱ्यांवर अनेकवेळा  कारवाई केली आहे. मात्र तरी देखील हे सुरुच असल्याचे दिसून येते. शनिवारी रात्री कल्याण डीसीपी स्कॉडचे पोलिस कर्मचारी यांना गांधारी रोडवर गुटख्याचा कंटेनर येणार असल्याची माहिती मिळाली. डीसीपी स्कॉड आणि खडकपाडा पोलिसांनी गांधारी रोडवर सापळा रचला आणि भिवंडी पडघामार्गे कल्याणमध्ये येत असलेला गुटख्याचा कंटनेर पोलिसांनी अडविला. त्यामध्ये गुटखा मिळून आले. याची बाजारातील किंमत 25 लाख रुपये आहेत.

पोलिसांनी या गुटख्याची तस्करी करणा-या कंटनेर चालक मशाक इनामदार याला अटक केली आहे. तो कर्नाटक येथील राहणारा आहे. त्याच्यासोबत उल्हासनगरात राहणारा लव सहानी, प्रेमचंद वाठोरे या दाेघांनाही अटक केली आहे. या प्रकरणात रजनीकांत गायकवाड याचा पोलिस शोध घेत आहेत. हा गुटखा कर्नाटकहून उल्हासनगरला आणण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा

Back to top button