कल्याणमध्‍ये इमारत कोसळून पतीचा मृत्यू, पत्‍नी गंभीर | पुढारी

कल्याणमध्‍ये इमारत कोसळून पतीचा मृत्यू, पत्‍नी गंभीर

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : कल्याण पश्चिम रामबाग परिसरातील इमारत कोसळली. यामध्ये पतीचा मृत्‍यू झाला. तर पत्‍नी गंभीर जखमी झाली आहे.

सूर्यकांत काकड (वय ६० ) आणि उषा काकड (वय ५६) हे कोशे इमारतीच्या तळ मजल्यावर राहत होते. त्यांचा मुलगा, सून आणि नातू हे बाजूच्या घरात राहत होते. अचानक इमारत कोसळली. यामध्ये सूर्यकांत यांचा मृत्‍यू झाला तर उषा काकड गंभीर जखमी झाल्‍या. त्यांना कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणी बाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

हेही वाचा  

Back to top button