सोलापूर : नगरप्रशासन सहाय्यक आयुक्त, मुख्याधिकारी यांच्या गैरकारभाराची चौकशी करून बडतर्फ करण्याची मागणी | पुढारी

सोलापूर : नगरप्रशासन सहाय्यक आयुक्त, मुख्याधिकारी यांच्या गैरकारभाराची चौकशी करून बडतर्फ करण्याची मागणी

सोलापूर, पुढारी वृत्‍तसेवा : नगर प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त अशिष लोकरे आणि माळशिरस नगरपालिकेचे मुख्याधिकारी गाढवे यांच्या गैरकारभाराची चौकशी करून त्याचा अहवाल द्यावा. यासाठी विभागीय कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. तसेच याबाबतचे पत्र नगर प्रशासन विभाग पुणे विभागीय आयुक्त पुनम मेहता यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिले.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, लोकरे आणि गाढवे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी, त्याना सेवेतून बडतर्फ करावे या मागणीसाठी किरण साठे हे विभागीय कार्यालया समोर उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी सोलापूर यांनी या प्रकरणी चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करावा असे पत्र मेहता यांनी दिले आहे. त्यामुळे लोकरे आणि गाढवे यांचीही चौकशी होणार असून त्‍यांच्याबात काय कारवाई केली जाणार याकडे  लक्ष लागले आहे.

हेही वाचा  

Back to top button