अभिजीत पाटलांना शिखर बँकेचा दिलासा; विठ्ठल कारखान्यावरील जप्ती उठवली
पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा: पंढरपूर येथील श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कर्ज वसुलीसाठी करण्यात आलेली राज्य सहकारी बँकेची कारवाई मागे घेण्यात आली आहे. यामुळे कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 430 कोटींच्या कर्जापोटी शिखर बँकेने केलेली जप्तीची कारवाई मागे घेतली आहे. उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अभिजित पाटील यांनी भेट घेत मदत करण्याची विनंती केली होती. तर फडणवीस यांनी आम्ही सहकार्य करतो, तुम्ही आम्हाला लोकसभेला सहकार्य करा, अशी अट घातली होती. त्यामुळे पाटील यांनी भाजपला पाठिंबा देत सहकार्याची भूमिका घेतली आहे.
सोलापूर व माढा लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय अभिजित पाटील यांना शासनाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. 430 कोटीच्या कर्जापोटी शिखर बँकेने केलेली जप्तीची कारवाई मागे घेतली आहे. शुक्रवारी सकाळी कारखाना साखर गोडावूनला लावलेले सिल काढण्यात आले आहे. कारवाईची जप्ती झाल्याने पाटील यांनी फडणवीसांची भेट घेतली होती. त्यानंतर घडामोडींना वेग आला.
अभिजित पाटील यांनी माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवारांना पाठिंबा देत फडणवीस यांना निमंत्रण दिले होते. आता कारखान्याची जप्तीची कारवाई मागे घेण्यात आली आहे. 5 मे रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दुपारी 1 वाजता अभिजित पाटील यांनी मेळाव्याचे आयोजन केले आहे. दरम्यान, प्रशासनाने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला लावलेलं सील काढण्यास सुरुवात केली आहे.
जुन्या संचालक मंडळाने केलेले हे कर्ज आहे. कर्ज वसुली प्रकरणी 2021 पासून बँकेची कारवाई सुरू आहे. माझ्यासाठी कारखाना चालणे महत्वाचे आहे. याकामी आम्ही राजकारण बाजूला सारून कारखान्याला महत्व दिले आहे. राज्य सरकार कारखान्याला मदत करणार आहे. आज कारखाना व बँकेकडून न्यायालयात दाद मागण्यात आली. तेव्हा न्यायलयाने जप्तीची कारवाई मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.
अभिजित पाटील, चेअरमन
हेही वाचा