नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मध्यस्थीनंतरही सीमाप्रश्न निवळत नसल्याचे दिसून आले आहे. आज, सोमवारी (दि.१९) शिवसेनेच्या (ठाकरे गट) वतीने खासदार अरविंद सावंत यांनी शून्य काळात सीमाप्रश्नाचा मुद्दा उपस्थित केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री केंद्रीय गृहमंत्र्यांचा अपमान करीत आहेत, असा दावाही यांनी या वेळी केला.