सोलापूर : उमेश पाटलांनी मोहोळमधून निवडणुकीला उभे राहावे, तेथे ताकद बघू – राजन पाटील | पुढारी

सोलापूर : उमेश पाटलांनी मोहोळमधून निवडणुकीला उभे राहावे, तेथे ताकद बघू - राजन पाटील

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : उमेश पाटील यांनी मोहोळ तालुक्यातील कोणत्याही निवडणुकीला उभे राहावे, त्याठिकाणी आपण ताकद बघू. ताकद ही वक्तृत्वात नसते, तर कर्तृत्वात असते. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की, त्यांनी कुठल्यातरी निवडणुकीला उभं राहावं. त्यांच्या विरोधात मी माझ्या कुटुंबातील कोणाला उमेदवारी देणार नाही, तर माझा सर्वसामान्य कार्यकर्ता लढेल, अशा शब्दांत मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजन पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांना आव्हान दिले.

भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील विधानावर स्पष्टीकरण देण्यासाठी माजी आमदार पाटील यांनी आज (१८ नोव्हेंबर) सोलापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी उमेश पाटील यांच्याकडून होणाऱ्या टीकेबाबत विचारले असते, त्यांनी वरील माहिती दिली.

     हेही वाचलंत का ?

 

 

Back to top button