

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी (Tushar Gandhi) शुक्रवारी सकाळी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत सामील झाले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राहुल गांधी यांनी सावरकरांच्या बाबतीत केलेल्या विधानावर ते म्हणाले, सत्य "सांगायला धाडस लागतं. सावरकरांनी ब्रिटिशांकडून पेन्शन घेतली हे सत्य आहे. राहुल गांधीनी मांडलेली भूमिका योग्य आहे, सत्य सांगायला घाबरलो तर आपण सत्याशी दगाबाजी केल्यासारखे आहे, असे म्हणत त्यांनी राहुल गांधी यांचे समर्थन केले आहे.
इंदुरच्या जुन्या भागात असलेल्या मिठाईच्या दुकानात अज्ञात व्यक्तीने पत्र (Threat to Rahul Gandhi) टाकले होते. हा प्रकार दुकान मालकाने पाहिल्यानंतर त्यांनी हे पत्र पोलिसांच्या ताब्यात दिले. या पत्रात राहुल गांधी यांना भारत जोडो यात्रेचा भाग म्हणून इंदूरच्या खालसा कॉलेजमध्ये थांबल्यास बॉम्बने स्फोट घडवून उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. डीसीपी रजत सकले यांनी धमकीचे पत्र मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. धमकीचे हे पत्र उज्जैनमधून आल्याचे सांगितले जात आहे. या पत्रात एका आमदाराच्या नावाचाही उल्लेख आहे.
हेही वाचा