इतके खोटारडे मुख्यमंत्री आजपर्यंत पाहिले नाहीत : किरीट सोमय्यांची उद्धव ठाकरेंवर टीका | पुढारी

इतके खोटारडे मुख्यमंत्री आजपर्यंत पाहिले नाहीत : किरीट सोमय्यांची उद्धव ठाकरेंवर टीका

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणी सादर केलेले प्रतिज्ञापत्र खोटे असल्याचा दावा सोमय्या यांनी आज (दि. १८) पत्रकार परिषदेत केला. तक्रार घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पोलीस आयुक्तांवर दबाव टाकला होता, इतके खोटारडे मुख्यमंत्री आजपर्यंत पाहिलेले नाहीत, अशी टीका सोमय्या यांनी यावेळी केली आहे.

आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणी बोगस तक्रारदार उभे करून संजय राऊत यांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप सोमय्या यांनी यावेळी केला. दोन महिन्यांपासून या तक्रारदाराचा शोध घेत आहे. परंतु त्यांचा पत्ता बोगस, फोन नंबर, बंद लागत आहे. तक्रारदार जीवंत आहे की, नाही हे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनाच माहित आहे, असे सोमय्या म्हणाले. ठाकरे सरकार आणि मुंबई पोलिसांनी खोटे बोलून मुंबई उच्च न्यायालय आणि सत्र न्यायालयाची फसवणूक केली आहे. नील सोमय्या आणि त्यांच्या निकॉन इन्फ्राशी संबंधित वसई प्रकल्पाच्या विरोधात प्राथमिक चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिलेले नाही, असा दावाही सोमय्या यांनी यावेळी केला.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २१ फेब्रुवारी २०२२ रोजी तक्रारदार पंढरीनाथ शंकरराव साबळे यांनी केलेल्या तक्रारीवरून नील सोमय्या, निकॉन इन्फ्रा आणि किरीट सोमय्या यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले होते. तसेच मुंबई पोलिसांनी नील सोमय्या यांच्याविरोधात १ मार्च रोजी मुंबई सत्र न्यायालयात आणि १० मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. यामध्ये आयएनएस विक्रांत निधीमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार केली होती.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button