Uddhav Thackeray | सत्ता आल्यास रेवण्णासारख्या व्यभिचाऱ्यांना बिळातून खेचून बाहेर काढू : उद्धव ठाकरे यांचा धुळ्यात हल्लाबोल | पुढारी

Uddhav Thackeray | सत्ता आल्यास रेवण्णासारख्या व्यभिचाऱ्यांना बिळातून खेचून बाहेर काढू : उद्धव ठाकरे यांचा धुळ्यात हल्लाबोल

धुळे : पुढारी वृत्तसेवा– इंडिया आघाडीची सत्ता केंद्रात बसणार आहे. त्यामुळे बिळात लपलेले रेवण्णासारखे व्यभिचा-यांना शेपट्या धरुन बिळातून बाहेर काढणार, मोदी-शहांनी लुटलेल्या महाराष्ट्राचे वैभव परत आणणार आहोत. आमच्या पाठीवर वार केला तर वाघनखांनी कोथळा बाहेर काढू, त्यामुळे भाजपाची ही मस्ती गाडून टाकण्यासाठी इंडिया व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करुन विजयी करावे असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले

धुळे लोकसभेसाठी भाजपाकडे उमेदवार नव्हता तेव्हा डॉ.सुभाष भामरे शिवसेना सोडून भाजपाकडून उभे राहिले. आणि खासदार झाले. त्यामुळे तेही गद्दारच निघाले, केंद्रात मंत्रीपद भोगले पण डॉ.भामरे आणि भाजपाच्या नाकर्तेपणामुळे धुळ्याची पूर्णपणे धुळधाण केली. पाण्याविना धुळ्याचे वाळवंट होण्याची भिती निर्माण झाली आहे. कांदा, कपाशीला भाव नाही त्यामुळे शेतकरी दु:खी आहे. कांद्यावर निर्यात बंदी करुन मोदी आणि भाजपाने शेतकर्‍यांशीही गद्दारी केली आहे. त्यामुळे इंडिया व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करुन भाजपाची मस्ती उतरवा असे आवाहन करीत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आजच्या सभेत भाजपावर कडाडून हल्लाबोल केला. दरम्यान इंडिया आघाडीला मिळणार प्रतिसाद पाहून भाजपा व मोदींच्या पायाखालची वाळू सरकु लागल्याने ते बेभान होवून खोटे आरोप करीत आहेत. आता नरेंद्र मोदींची झोला लेके आऐ थे, झोला लेके जाएंगेची वेळ झाली असल्याचा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांनी हाणला.

इंडिया व महाविकास आघाडीच्या धुळे लोकसभेतील उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी धुळे येथील जेलसमोर यांची विराट सभा झाली. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी उपस्थित जनसमुदारासमोर बोलतांना सांगितले की, डॉ. शोभा बच्छाव ह्या धुळ्याच्या उद्याच्या खासदार आहेत. हे आजच्या गर्दीने सिध्द केले आहे. धुळ्याच्या जनतेने भाजपाचा नाकर्तेपणा पाहिला, केंद्रात मंत्री असलेल्या डॉ.सुभाष भामरेंनी व भाजपाने धुळ्याची धुळदाण करुन टाकली, पाण्याअभावी धुळ्याचे रखरखीत वाळवंट होण्याची भिती निर्माण झाली आहे. धुळ्यासह महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी दुखी आहे. गुजरातची कांद्यावरील निर्यातबंदी नरेंद्र मोदी उठवितात आणि महाराष्ट्राशी भेदभाव करतात. मात्र महाराष्ट्र भाजपाला दिल्ली पाहू देणार नाही, कारण त्यांनी शेतकर्‍यांशी गद्दारी केली आहे. बहीण भावाच्या नात्याला बदनाम करण्याची संस्कृती भाजपाची आहे.

व्यभिचारी, बलात्कारी प्रज्वल रेवण्णासाठी नरेंद्र मोदी मते मागतात हे भाजपाचे संस्कार आणि संस्कृती आहे. इंडिया आघाडीची सत्ता केंद्रात बसणार आहे. त्यामुळे बिळात लपलेले रेवण्णासारखे व्यभिचा-याना शेपट्या धरुन बिळातून बाहेर काढणार, मोदी-शहांनी लुटलेल्या महाराष्ट्राचे वैभव परत आणणार आहोत. याच महाराष्ट्राने दोन वेळी 40 पेक्षा जास्त जागा भारतीय जनता पार्टीला दिल्या. त्यामुळे यांना पंतप्रधान पदावर बसता आले. पण आता हाच महाराष्ट्र त्यांना सत्तेवरून खाली खेचणार असल्याचा दावा ठाकरे यांनी यावेळी केला. आमच्या पाठीवर वार केला तर वाघनखांनी कोथळा बाहेर काढू, त्यामुळे भाजपाची ही मस्ती गाडून टाकण्यासाठी इंडिया व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करुन विजयी करावे असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतेवर स्वारी केली. पण आता दोन गुजराती महाराष्ट्र लुटत आहेत. पण महाराष्ट्रात पराक्रम शिल्लक आहे. पाठीवर वार करणाऱ्यावर वाघनख वापरले जाते. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने मतदान करतांना एका बोटाचा वापर करून हुकूमशहाला गाडण्यासाठी समर्थ आहे. अशी वज्रमुठ आवळली पाहिजे, असे सांगतानाच महाराष्ट्र मधील सर्व 48 जागा महाविकास आघाडी जिंकणार आहे. चार जून रोजी आम्ही गोमूत्रधारी यांना फेकून देणार असल्याचे टीका देखील त्यांनी यावेळी केली. महाविकास आघाडी सत्तेत आल्यास सुरत मध्ये जाऊन त्यांना बिळामधून खेचून काढू असे आव्हान देखील त्यांनी दिले.

बेभान होवून मोदींचे बेछूटपणे आरोप

सभेत बोलतांना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांनी सांगितले की, केंद्रातील सरकार हे तानाशाह सरकार आहे. मोदी सरकारने संवैधानिक व्यवस्था मोडून काढीत लोकशाही संपविण्याचे काम केले आहे. देशात आणि महाराष्ट्रात इंडिया व महाविकास आघाडीला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. निवडणूकीच्या प्रत्येक टप्प्यात इंडिया आघाडी पुढे असल्याचे पाहून नरेंद्र मोदी बेभान होवून बेछूटपणे आरोप करीत आहेत. त्यांची पायाखालची वाळू सरकू लागली आहे. झोला लेके आए थे, झोला लेके जाण्याची वेळ नरेंद्र मोदींची झाली असल्याचा टोला प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी हाणला. सभेत महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील, उमेदवार शोभा बच्छाव, माजी आ.अनिल गोटे, महेश मिस्त्री आदींनी मनोगते व्यक्त केली.

सभेला संपर्कप्रमुख अशोक धात्रक, आ.नरेंद्र दराडे, काँग्रेस जिल्हाध्रकक्ष शामकांत सनेर, प्रदेश सरचिटणीस युवराज करनकाळ, माजी आ.डि.एस.अहिरे, शिवसेना प्रमुख अतुल सोनवणे, माजी आ.प्रा.शरद पाटील, महेश मिस्त्रि, हेमंत साळुंखे,हिलाल माळी,धिरज पाटील, सौ.शुभांगी पाटील,डॉ.अनिल भामरे, गायत्री जयस्वाल, हेमंत साळुंखे, माजी आ.रामकृष्ण पाटील,प्रमोद सिसोदे,अलोक रघुवंशी, साबीर खान, डॉ.सुशिल महाजन,कैलास पाटील,किरण जोंधळे यांच्यासह इंडिया व महाविकास आघाडीतील पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा –

Back to top button