सोलापूर : गावोगावी आखाड यात्रा उत्साहात; मानाचा पोतराज मागतो सुखाचे दान | पुढारी

सोलापूर : गावोगावी आखाड यात्रा उत्साहात; मानाचा पोतराज मागतो सुखाचे दान

माळीनगर; गोपाळ लावंड :  “लक्ष्मीआईचं चांगभलं ” पोतराजाच्या आरोळीने सूर्य माथ्यावर आला की गावोगावी जत्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. हलगीच्या आवाजाने श्रध्दाळू भक्तांचा ओढा लक्ष्मी देवीच्या मंदिराकडे चालू लागतो. धूपआरती करून यात्रा सुरू केली जाते. आषाढ यात्रा अर्थात आखाड यात्रा माळीनगर पूर्व भागात यंदा उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील यात्रेसाठी अबालवृद्धांची सकाळपासून लगबग सुरू होती.

लक्ष्मीआईची मनोभावे पूजा करणारे खेडोपाड्यातील लोक हरखून गेले होते. आपल्या लेकराबाळांसाठी आशीर्वाद घेण्यासाठी महिलांची एकच लगबग पहायला मिळत होती. तर शेतकरी शेतातील पिकपाणी चांगलं यावं, यासाठी प्रार्थना करत होते. एकंदरीत गावखेड्यातील पिढीजात रूढी परंपरा या एकमेकांना जोडण्यासाठी आणि आनंद उत्साह वाटून घेण्यासाठी निर्माण केल्याची भावना या काळात निर्माण होते .

आम्ही आमच्या अनेक पिढ्यांपासून पोतराज म्हणून गावांची यात्रा पार पाडत असतो. धूपआरती करून लक्ष्मीआईला गावाच्या संरक्षणाचे दान मागून यात्रा सुरू होते .
– मिलिंद ढावरे
पोतराज

     हेही वाचा

Back to top button