Solapur Lok Sabha Election : सोलापूर लोकसभा मतदारसंघात 5.97 टक्के, माढ्यात 5.15 टक्के मतदान | पुढारी

Solapur Lok Sabha Election : सोलापूर लोकसभा मतदारसंघात 5.97 टक्के, माढ्यात 5.15 टक्के मतदान

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात आज सकाळी ७ वाजल्यापासून अत्यंत चुरशीने मतदान सुरू झाले आहे. सकाळच्या सुमारास ऊन कमी असल्याने मतदान केंद्रावर नागरिकांच्या रांगा दिसून येत आहेत. विशेष करून वृद्ध नागरिक मतदान करून निश्चिंत होत आहेत.

दरम्यान निवडणूक कार्यालयाकडून सोलापूर लोकसभा आणि माढा लोकसभा मतदारसंघातील सकाळी सात ते सकाळी नऊ या दोन तासातील मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. त्यामध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघात 5. 97 टक्के तर माढा लोकसभा मतदारसंघात 5.15 टक्के इतके इतके मतदान झाल्‍याचे समोर आले आहे.

हेही वाचा : 

Back to top button