पावसाचा जोर वाढला, कोयना धरणातून आज विनावापर पाणी सोडणार | पुढारी

पावसाचा जोर वाढला, कोयना धरणातून आज विनावापर पाणी सोडणार

पाटण ; पुढारी वृत्तसेवा : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून, धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी ८५७३ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. १०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात आता १०१.५७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. यापुढे केवळ ३.६८ टीएमसी पाणी सामावून घेण्याची क्षमता व आगामी काळातील पाऊस लक्षात घेता आज (मंगळवार) दुपारी दोन वाजता कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे दीड फुटाने वर उचलून पुर्वेकडे कोयना नदी पात्रात प्रतिसेकंद १२,८९१ क्युसेक्स पाणी सोडण्यात येणार आहे.

नदीकाठच्या गावांना यासाठी सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या धरण पायथा विद्युत गृहामधून १०५० क्युसेक्स विसर्ग चालू असल्‍याने दुपारनंतर कोयना धरणातून नदीपात्रात एकूण १३९४१ क्युसेक्स विसर्ग सुरू राहणार आहे. त्यामुळे कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा :  

Back to top button