कोंभळी : सीना धरण.. हाऊसफुल्ल! नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

कोंभळी : सीना धरण.. हाऊसफुल्ल! नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
Published on: 
Updated on: 

कोंभळी; पुढारी वृत्तसेवा: कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना मध्यम प्रकल्प सोमवारी (दि.12) रात्री उशिरा ओव्हरफ्लो झाले. नगर परिसरात जोरदार पाऊस, तसेच भोसे खिंडीद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने धरण हाऊसफुल्ल झाले आहे. कर्जत, श्रीगोंदा व आष्टी तालुक्यासाठी जीवनदायिनी सीना धरण सलग तिसर्‍या वर्षी पूर्ण क्षमतेने भरल्याने लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सीना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सीना नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

सध्या सीना धरणात भोसे खिंडीद्वारे कुकडीचे ओव्हरफ्लोचे तसेच नगर परिसरात झालेल्या पावसाचे पाणी सीना धरणात येत असून सीना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 522 मिमी इतका पाऊस झालेला आहे, नगर सोलापूर महामार्गाचे काम चालू असल्याने सीना धरणाचे कालवे फोडून त्याठिकाणी पूल बांधण्याचे काम सुरू नाहीत, धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सीना धरणाच्या कालव्यातुन देखील पाणी सोडता येणार नाही, त्यामुळे सीना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस किंवा अतिवृष्टी झाल्यास धरणाच्या सांडव्यावाटे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होऊन नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देऊन सूचना केल्या आहेत.

सीना धरणाची क्षमता दोन हजार चारशे दशलक्ष घनफूट आहे. कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथे धरण आहे. अहमदनगर तालुक्यातील जेऊर, बहिरवाडी, पिंपळगाव माळवी, नगर आदी ठिकाणी झालेल्या पावसावरच धरणाची भिस्त आहे. दमदार पावसामुळे सीना नदीला पूर आला होता. सीनेच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने व कुकडीच्या पाण्यामुळे धरण भरले आहे.

सीना धरणातीला पाण्यावर निमगाव गांगर्डा, मिरजगावसह 17 गावांची पाणी योजना अवलंबून आहे. त्यात मिरजगाव व श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण या मोठ्या गावांच्या पाणी योजनांचाही समावेश आहे. सीनेतून आष्टी तालुक्यातील मेहकरी प्रकल्पातही पाणी सोडण्यात आले होते. सीना धरणावर उजवा व डावा कालवा असल्याने कालव्या खालील शेतीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

सीना नदीच्या उगम क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे सलग तिसर्‍या वर्षी सीना धरण ओव्हरफ्लो झाल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तीन वर्षांपासून सीना धरण पूर्ण क्षमतेने भरत असल्याने सीना पट्ट्यातील व कॅनॉल पट्ट्यातील शेती फुलत चालली असून, शेतकरी समृद्ध होत आहे. सीना धरण भरल्याने यावर्षी पाणी प्रश्न मिटला आहे.
                                                           – परमवीर पांडुळे,
                                                  माजी सदस्य, जिल्हा परिषद

सीना धरण भरल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. नगर परिसरात झालेल्या पावसाने व कुकडीच्या पाण्याने सीना धरण रात्री उशिरा पूर्ण क्षमतेने भरले.
                                                                 – प्रकाश लोखंडे,
                                                                  शाखा अभियंता

सप्टेंबरच्या मध्यात भरले
पावसाच्या कमी प्रमाणामुळे सीना धरण झाल्यापासून ते भरण्याची वेळ एक तर फार कमी वेळा येते; परंतु यंदा सीना धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे व भोसे खिंडीद्वारे कुकडीचे ओव्हरफ्लोचे पाणी सीना धरणात सोडल्यामुळे सीना धरण सप्टेंबरच्या मध्यात भरले आहे. 2020 मध्ये जुलै अखेर धरण भरल्याने अहमदनगर जिल्ह्यातील पहिले धरण भरण्याचा मान सीना धरणाला मिळाला होता. 2021 मध्ये धरण सप्टेंबर अखेर भरले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news